Home महाराष्ट्र सातारा जिल्हा माहिती | Satara District Information

सातारा जिल्हा माहिती | Satara District Information

0
सातारा जिल्हा माहिती | Satara District Information

सातारा जिल्हा Satara District

Maharashtra sena News– सातारा जिल्हा माहिती ( Satara District information)

सातारा जिल्हा (Satara District) महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक. सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सातारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील बाजूस स्थित आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे जिल्हा, पूर्व दिशेला सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सांगली आणि पश्चिमेला रत्नागिरी जिल्हा व उत्तर-पश्चिमेला रायगड जिल्हा आहे.

सातारा जिल्हा कृष्णा आणि भीमा नदींच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. सातारा जिल्हा (Satara District)  हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा, शिखरे आणि उंच पठारांनी वेढलेला आहे. या पर्वत रांगांची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट इतकी आहे. हवामानाच्या बाबतीत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर ( Mahabaleshwar) तालुका हा पट्टा अधिक पाऊस पडणाऱ्या विभागात येतो. महाबळेश्वर येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे ६००० मिमी असून माण- खटाव चा विभाग हा कोरड्या क्षेत्रात येतो. माण- खटाव येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ५०० मिमी आहे.

सातारा जिल्ह्याचा नकाशा  ( Satara District Map )

Satara District

सातारा जिल्हा भौगोलिक क्षेत्र : १०४८० (स्क्वे.कि.मी.)

सातारा जिल्ह्यातील नद्या

कृष्णा (Krishna River) आणि कोयना (Koyna River) या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत.

कृष्णा नदी (Krishna River) – हि दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र नद्यांपैकी एक आहे. कृष्णा नदी महाबळेश्वर ( Mahabaleshwar) मध्ये उगम पावते. कृष्णा नदीचा जवळपास १७२ किमी चा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो. कुडाळी, वेण्णा, उरमोडी आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील उप नद्या आहेत.

कोयना नदी (Krishna River) – ही कृष्णा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्वेकडील भागात नीरा व माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये प्रमुख मदत करणाऱ्या दोन उपनद्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था

क्र तपशील        संख्या      नावे
१. नगरपालिका    (०९)    -सातारा, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, कऱ्हाड, फलटण, रहिमतपूर, म्हसवड,मलकापूर
२.जिल्हा परिषद    (०१)     सातारा
३. पंचायत समित्या  (११ ) सातारा, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कऱ्हाड, पाटण, कोरेगाव, माण, खटाव, फलटण, जावळी
४. गावे/ग्रामपंचायती (1719)

सातारा जिल्हा तहसील / सातारा जिल्हा तालुके:

सातारा जिल्ह्यात एकूण ११ तालुके आहेत. (satara district taluka list)
सातारा
कराड
जावली
वाई
महाबळेश्वर
खंडाळा
फलटण
माण
खटाव
कोरेगांव
पाटण

सातारा जिल्ह्यातील गावे

सातारा जिल्हा प्रत्येक तालुक्यातील एकूण गावांची संख्या

अनु. क्र. तालुका      एकूण गावे
1   जावळी      153
2  महाबळेश्वर  110
3  वाई           126
4  सातारा        205
5  पाटण         338
6  कराड        216
7  खटाव        139
8  कोरेगाव      138
9  फलटण       125
10  माण         104
11 खंडाला       65

सातारा जिल्हा लोकसंख्या

सातारा जिल्हा लोकसंख्या
2011 च्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्यातील लोकसंख्या-
एकूण लोकसंख्या ३००३७४१ आहे.
एकूण पुरुषांची लोकसंख्या 1510842
एकूण स्त्री लोकसंख्या 1492899

सातारा जिल्हा पाहाण्यासारखी ठिकाणे

महाबळेश्वर, पांचगणी, अजिंक्यतारा, कास पठार, ठोसेघर धबधबा, वाई चा गणपती.

सातारा लोकेशन

सातारा हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्यापासून दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे
तर मुंबई ते सातारा अंतर ३०० किलोमीटर.

हे सुद्धा वाचा-

महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे ( Places to visit in Mahabaleshwar )

राजधानी सातारा सेल्फी पॉईंट

सातारा जिल्हा तालुका यादी | Satara District Taluka List in Marathi

सातारा जिल्ह्यातील किल्ले | Forts in Satara District

सातारा जिल्हा स्थापना

सातारा हे शहर १६ व्या शतकात स्थापित झाले होते.

FAQ: 

प्रश्न : सातारा जिल्ह्यामध्ये किती गावे आहेत ?
उत्तर : सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 719 गावे आहेत.

प्रश्न : सातारा किती किलोमीटर आहे ?
उत्तर : सातारा हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्यापासून दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे
तर मुंबई ते सातारा अंतर ३०० किलोमीटर.