Womens Premier League 2023 | महिला प्रीमियर लीग

Womens Premier League 2023 (महिला प्रीमियर लीग)

Maharashtrasena News: Womens Premier League 2023

महिला प्रीमियर लीग (Womens Premier League- WPL), ज्याला टाटा डब्ल्यूपीएल (TATA WPL) म्हणून देखील ओळखले जाते, ही भारतातील एक महिला ट्वेन्टी-20 क्रिकेट फ्रँचायझी लीग आहे. याचे सर्व मालकी हक्क हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) आहे.

महिला प्रीमियर लीग (WPL) चा पहिला हंगाम मुंबई आणि नवी मुंबई येथे खेळला जात आहे, Womens Premier League मध्ये सध्या पाच फ्रँचायझी नी भाग घेतला आहे.

इतिहास

भारतातील पहिली मोठी महिला ट्वेंटी-२० स्पर्धा म्हणजे महिला टी-२० चॅलेंज. ही स्पर्धा 2018 मध्ये एक-सामन्यांची स्पर्धा म्हणून सुरू झाली होती आणि २०१९, २०२० व २०२२ मध्ये आयोजित महिला टी-२० स्पर्धा ही तीन-संघ, तीन सामन्यांच्या पर्यंत विस्तारित केली गेली.

फेब्रुवारी 2022 या वर्षी, बीसीसीआय (BCCI) चे अध्यक्ष सौरव गांगुलीने ( Saurav Ganguly) महिला टी-20 चॅलेंजऐवजी भारतातील प्रसिद्ध असलेली लीग म्हणजे पुरुष ट्वेन्टी-20 लीग इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League – IPL)क्रिकेट स्पर्धा याचे महिला आवृत्ती स्थापन करण्याची योजना जाहीर केली. ऑगस्टपर्यंत योजना अधिक प्रगत झाल्या आणि ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयने जाहीर केले की मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या स्पर्धेत ५ संघ खेळतील. या लीग ला “महिला इंडियन प्रीमियर लीग Women’s Indian Premier League म्हणून ओळखले जाऊ लागले ; 25 जानेवारी 2023 रोजी बीसीसीआयने अधिकृतरित्या या स्पर्धेला “महिला प्रीमियर लीग” (Women’s Premier League-WPL)असे नाव जाहीर केले.

28 जानेवारी 2023 रोजी, बीसीसीआय (BBCI) ने 2027 पर्यंत लीगच्या टायटल स्पॉन्सरशिप हक्कांसाठी निविदा मागविल्या. टाटा समूहाने ( TATA Group) अघोषित रकमेची बोली जिंकली. व २०२३ ते २०२७ पर्यंत चे टायटल स्पॉन्सरशिप मिळवली.

फ्रँचायझी / WPL Teams

[table id=8 /]

WPL Schedule, Time Table

WPL schedule 2023 | महिला प्रीमियर लीग – वेळापत्रक – Maharashtrasena News