Sunday, April 20, 2025
Homeराष्ट्रीयChandrayaan 3: भारताची अंतराळ क्षेत्रातली महत्वाकांक्षी मोहिम चंद्रयान-३ चं अवकाशात यशस्वी उड्डाण

Chandrayaan 3: भारताची अंतराळ क्षेत्रातली महत्वाकांक्षी मोहिम चंद्रयान-३ चं अवकाशात यशस्वी उड्डाण

भारताची अंतराळ क्षेत्रातली महत्वाकांक्षी मोहिम चंद्रयान-३ चं अवकाशात यशस्वी उड्डाण

Maharashtrasena News: अंतराळ क्षेत्रातली भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान -३ (Chandrayaan 3) चं आज दुपारी बरोबर २ वाजून ३५ मिनिटांनी, आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केन्द्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. या मोहिमेचे संचालक एस. मोहन कुमार यांनी चांद्रयान ३ (Chandrayaan 3) च्या उड्डाणाचे निर्देश दिले. त्यानंतर यान अवकाशात झेपावलं.

चंद्रयान, चंद्राच्या कक्षेपासून १०० किमी अंतरावर असताना, एल बी एम-थ्री, एम-फोर रॉकेटपासून लँडर यशस्वीपणे वेगळं झालं. पृथ्वीच्या कक्षेपासून वेगळं होत, चांद्रयानानं चंद्राच्या कक्षेसाठी आपला प्रवास सुरु केला आहे. आता साधारण २३/२४ ऑगस्टला हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यता आहे. काल दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी चांद्रयान-३ (Chandrayaan 3)ची उलटगणना सुरु झाली. ही मोहीम भारतासह संपूर्ण जगासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

हे चांद्रयान यशस्वीपणे उतरल्यावर, चंद्रावर यान पाठवणारा भारत जगातला चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा पहिला देश ठरणार आहे. याआधी, अमेरिका, रशिया आणि चीननं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं, २ दिवसांपूर्वीच चंद्रावर चांद्रयान उतरवण्याची पूर्वचाचणी यशस्वी केली. चांद्रयान-३ लंबवर्तुळाकार कक्षेत ३० दिवसांचा प्रवास करून चंद्रावर पोहोचणार आहे. चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचा अभ्यास करणं हा या चांद्रमोहिमेचा एक हेतू आहे. चांद्रयानासह जात असलेलं रोवर, चंद्रावर विविध भागांमध्ये संशोधनासाठी प्रयोग करणार आहे. तसंच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील परिस्थितीचा ते अभ्यास करणार आहे.

याआधी २०१९ साली, चांद्रयान-२ मोहिम अंशतः अयशस्वी झाली होती. त्यातल्या त्रुटी दूर करुन ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सज्ज झाली आहे. चांद्रयान-३ अंतराळ यानामध्ये, प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर यांचा समावेश आहे. यात ऑर्बिटरचा समावेश नाही. लँडरला चंद्रावर सुरक्षितपणे उतरवणं, हा मोहिमेचा उद्देश आहे. यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते. ही मोहीम यशस्वी करणाऱ्या इस्रोच्या सर्व चमूचं त्यांनी अभिनंदन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या धोरणांमुळे आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारख्या वैज्ञानिकांनी अंतराळ क्षेत्रात आखलेल्या दूरदर्शी धोरणामुळे हे यश आपल्याला मिळालं आहे, असं ते म्हणाले.

इस्रोचे (Indian Space Research Organisation- ISRO) संचालक एस सोमनाथ यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल सर्व चमुचं अभिनंदन केलं. आधीच्या चांद्रयान मोहिमेतल्या त्रुटी दूर करुन हे प्रक्षेपण करण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं. या मोहिमेचं यश संपूर्ण भारताचं यश असेल, असं डॉ. सोमनाथ म्हणाले.

 

(Indian Space Research Organisation- ISRO)

chandrayaan 3, chandrayaan 3 launch date, isro, chandrayaan 3 launch date and time, sriharikot, achandrayaan 3 launch, chandrayaan 3 launch date time, isro chairman, chandrayaan 3 live, isro full form, chandrayaan 2, chandrayaan-3 launch date, chandrayan 3, chandrayaan 3 launch live, chandrayaan 3 launch time, chandrayaan 2 launch date,nasa, isro chandrayaan 3, when will chandrayaan 3 land on moon, chandrayaan 3 launch place, chandrayaan, kalpana chawla, chandrayaan 1, isro live, chandrayan

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!