Saturday, September 30, 2023
Homeक्रीडाराष्ट्रकृुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ३ सुवर्णपदकांची कमाई | India won 3...

राष्ट्रकृुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ३ सुवर्णपदकांची कमाई | India won 3 gold medals in the National Weightlifting Championship

राष्ट्रकृुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ३ सुवर्णपदकांची कमाई

Maharashtrasena News:  नोएडा इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरु असून, आतार्यंत भारतानं २२ सुवर्ण आणि ९ रौप्य पदकांसह एकूण ३१ पदकांची कमाई केली आहे.

स्पर्धेच्या काल दुसऱ्या दिवशी महिलांच्या ६४ किलो वजनी युवा गटात हर्षिकानं एकूण १५५ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावलं.

६४ किलो कनिष्ठ गटात एस.पल्लवीनं सुवर्णपदक तर वरिष्ठ गटात रौप्य पदक पटकावलं पल्लवीनं एकूण १९३ किलो वजन उचललं.

६४ किलो वरिष्ठ गटात एस. निरुपमा देवीनं एकूण २०६ किलो उचलत सुवर्णपदकाची कमाई केली.

पुरुषांच्या ६७ किलो कनिष्ठ गटात मार्कियोनं एकूण २७८ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावलं. तर ६७ किलो वरिष्ठ आणि कनिष्ठ गटात टी माधवननं २६८ किलो वजन उचलत रौप्य पदकाची कमाई केली.

India won 3 gold medals in the National Weightlifting Championship

Commonwealth Games

World Weightlifting Championship 2023

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!