Home महाराष्ट्र Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना कर्ज देण्याची टाळाटाळ करणाऱ्याआडमुठ्या बँकांवर प्रसंगी अत्यंत कठोर कारवाई करण्याचा इशारा – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना कर्ज देण्याची टाळाटाळ करणाऱ्याआडमुठ्या बँकांवर प्रसंगी अत्यंत कठोर कारवाई करण्याचा इशारा – देवेंद्र फडणवीस

0
Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना कर्ज देण्याची टाळाटाळ करणाऱ्याआडमुठ्या बँकांवर प्रसंगी अत्यंत कठोर कारवाई करण्याचा इशारा – देवेंद्र फडणवीस

Maharashtrasena : काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याची टाळाटाळ करतात, अशा आडमुठ्या बँकांवर प्रसंगी अत्यंत कठोर कारवाई करु असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister, Devendra Fadnavis) यांनी आज दिला. आज मुंबईत (Mumbai) झालेल्या राज्यस्तरिय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गरज पडल्यास अशा बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे संकेतही त्यांनी दिले. आजच्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा घेण्यात आला.

जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा सुरु करणं, गाळमुक्त धरणं आणि गाळयुक्त शिवार योजनेला गती देणं, सिंचन क्षेत्र वाढवायचा प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना दिवसा सलग १२ तास वीज मिळावी यासाठी सोलर फिडर बसवणं आदि मुद्यांवर व्यापक चर्चा झाली आणि या गोष्टी लवकरात लवकर प्रत्यक्षात याव्यात यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावरही एकमत झालं, असं उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)म्हणाले.

येत्या २८ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi)यांच्या हस्ते नवीन संसदभवन राष्ट्राला समर्पित केलं जाईल. संसदभवन हे भारताच्या सामर्थ्याचं प्रतिक आहे. याबाबतीत पंतप्रधानांना जो विरोध होत आहे. तो लोकशाहीविरोधी आणि हास्यास्पद आहे. पंतप्रधानांच्या कोणत्याही गोष्टीला केवळ आंधळा विरोध करत राहणं हाच विरोधकांचा एकमेव कार्यक्रम असल्याचं उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी सांगितलं.

 

Deputy Chief Minister, Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

Bank loan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here