Home महाराष्ट्र Kharif Season 2023 : राज्यस्तरीय पूर्व खरीप हंगाम आढावा बैठकीचं मुंबईत आयोजन

Kharif Season 2023 : राज्यस्तरीय पूर्व खरीप हंगाम आढावा बैठकीचं मुंबईत आयोजन

0
Kharif Season 2023 :  राज्यस्तरीय पूर्व खरीप हंगाम आढावा बैठकीचं मुंबईत आयोजन

Kharif Season 2023 : राज्यस्तरीय पूर्व खरीप हंगाम आढावा बैठकीचं मुंबईत आयोजन

Maharashtrasena :  राज्यातल्या सगळ्या विभागांनी खरीप हंगामासाठीची सगळी तयारी पूर्ण केली आहे. सगळ्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संवेदनशीलपणे काम करावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी केलं आहे. आज मुंबईत राज्यस्तरिय खरीपहंगामपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक उच्चस्तरिय अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टांचा योग्य मोबदला मिळण्यासाठी नवनवीन पद्धती आणि संकल्पना राबवाव्या लागतील, कृषी पर्यटन वाढवावं लागेल तसंच शेतीचं मूल्यवर्धन करावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना बियांणांचा, खतांचा तुटवडा जाणवणार नाही, तसंच चांगल्या प्रतीचं बियाण आणि खतांचा वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यामध्ये कोणत्याही प्रकारचं बोगस काम करून बळीराज्याच्या जिवाशी खेळणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असं ते म्हणाले.

हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार असून या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची गरज पडणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना सगळे फायदे खरीप हंगामापूर्वी देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यासाठी सगळ्या कृषी केंद्रांवर जागरुकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी ज्या बँका वेळकाढूपणा करत आहेत, त्यांनाही लवकरात लवकर काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis)दिल्या.

ज्या शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळालेली नाही, त्यांना ती देण्यात यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागाला दिले. आगामी खरीप हंगामात विक्रमी उत्पादन घेण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या बैठकीत सांगितलं.

 

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

State level pre-kharif season review meeting organized in Mumbai

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here