मराठी भाषा दिन | मराठी राजभाषा दिन (Marathi Bhasha Din)

मराठी भाषा दिन / मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (marathi bhasha din)

महाराष्ट्र सेना ऑनलाइन | ” मराठी भाषा दिन / मराठी राजभाषा दिन (marathi bhasha din) महाराष्ट्रामध्ये दरवर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.

मराठी साहित्याचा मानदंड, जेष्ठ कवी श्री. विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, हा ” मराठी भाषा दिन ” म्हणून साजरा केला जातो .

“महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ अनुसार” महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित करण्यात आले.

जेष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) यांनी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले व मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते.

kusumagraj

श्री. विष्णू वामन शिरवाडकर ( कुसुमाग्रज )

जन्म : २० फेब्रुवारी १९१२ ( पुणे )

निधन : १० मार्च १९९९ ( नाशिक )

मराठी कवी , नाटककार , कादंबरीकार

गाजलेली नाटके : नटसम्राट, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, दुसरा पेशवा , राजमुकुट, दूरचे दिवे इत्यादी .

कादंबरी: कल्पनेच्या तीरावर, जान्हवी, वैष्णव.

काव्यसंग्रह : विशाखा, जीवनलहरी, किनारा, वादळवेल, मराठी माती, स्वगत , हिमरेषा, जाईची कुंभ, समिधा, मेघदूत अनुवाद, रसयात्रा , छंदोमयी, मुक्तायन श्रावण,

प्रवाशी पक्षी, माधवी, पायेथं, बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज ,महावृक्ष, चाफा , करार एका ताऱ्याशी, अक्षरबाग, मारवा, थांब सहेली.

पुरस्कार : पदमभूषण , ज्ञानपीठ


कुसुमाग्रज यांची नाटके : आनंद, ऑथेल्लो, आमुचे नाव बाबुराव, एक होती वाघीण, किमयागार, कैकयी, कौंतेय, महंत, चंद्र जिथे उगवत नाही, दुसरा पेशवा, दूरचे दिवा,

बेकेट, मुख्यमंत्री,नटसम्राट, राजमुकुट, विदूषक, वीजयंती, वीज म्हणाली धरतीला, ययाती आणि देवयानी .


कुसुमाग्रज यांचा जीवनप्रवास :

१९१२: जन्म -२० फेब्रुवारी १९१२ ( पुणे )

१९१९ -१९२४ : प्राथमिक शिक्षण (पिंपळगाव )

१९२४ – १९२९ : माध्यमिक शिक्षण (नाशिक )

१९२९ : मॅट्रिक्युशन उत्तीर्ण ( मुंबई ), बालबोधमेवा मध्ये कविता व लेखन

१९३०: सत्याग्रहात सहभाग – काळाराम मंदिर प्रवेश

१९३३ : ” जीवन लहरी ” पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले .

१९३४ : मराठी – इंग्रजी मध्ये बी. ए. परीक्षा उत्तीर्ण

१९३६- १९३८ : सती सुलोचना कथालेखन आणि लक्ष्मणाची भूमिका निभावली

१९३८-१९४६ : वृत्तपत्र चा व्यवसाय मध्ये प्रवेश – ( नवयुग, दैनिक प्रभात, सारथी, साप्ताहिक प्रभा, धनुर्धारी इ.)

१९४२ : विशाखा काव्यसंग्रह

१९४४: विवाह – ( पत्नीचे नाव -: मनोरमा )

१९४६ : पहिले नाटक -“दूरचे दिवे ” व पहिली कादंबरी -“वैष्णव “, “स्वदेश ” या साप्ताहिकाचे संपादन

१९५०: लोकहितवादी मंडळाची स्थापना

१९५६: अध्यक्ष मुंबई उपनगर साहित्य

१९५९ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सत्याग्रह

१९६० : अध्यक्ष -मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय वार्षिक उत्सव

१९६० : राज्यपुरस्कार -“मराठी माती ” या काव्यसंग्रह साठी.

१९६२ : राज्यपुरस्कार- “स्वगतं ” या काव्यसंग्रह साठी.

१९६४ : राज्यपुरस्कार- “हिमरेषा” या काव्यसंग्रह साठी.

१९६४ : अध्यक्ष – गोवा येथे झालेल्या -“अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनअधिवेशन – (४५ वे) चे. ” .

१९६४ – ६७ : सदस्य – पुणे विद्यापीठ विधी मंडळ

१९६६ : राज्यपुरस्कार- “ययाती आणि देवयानी ” या नाटकासाठी .

१९६७ : राज्यपुरस्कार- “वीर म्हणाली धरतीला ” या नाटकासाठी .

१९७०: अध्यक्ष – कोल्हापूर- मराठी नाट्य संमेलन

१९६६ : राज्यपुरस्कार- “नटसम्राट ” या नाटकासाठी .

१९७०: अध्यक्ष – नाशिक येथील – सार्वजनिक वाचनालय

१९८५ : राम गणेश गडकरी पुरस्कार

१९८८ : ज्ञानपीठ पुरस्कार

१९८८ : अकादमी पुरस्कार- संगीत व नाट्यलेखन

१९८९ : अध्यक्ष – मुंबई – जागतिक मराठी परिषद

१९९१ : पद्मभूषण

निधन : १० मार्च १९९९ ( नाशिक )

Leave a Comment

error: Content is protected !!