PM Kisan Samman Nidhi Yojana | PM Kisan सम्मान निधी योजना नवीन नियम

PM Kisan Samman Nidhi Yojana नवीन नियम

दिल्ली | PM Kisan Samman Nidhi Yojana या मध्ये काही नवीन नियम केंद्र सरकारने घडवले आहेत.

PM Kisan सम्मान निधी योजना ही दिनांक १ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत २००० हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकरी कुटुंबाना ६००० रुपये वार्षिक उत्पन्न पाठबळ लाभ केंद्र सरकार कडून देण्यात येणार आहे.

या केंद्र शासनाच्या योजनेसाठी भारत सरकार १०० % आर्थिक साहाय्य करणार आहे.

राज्य सरकार व केंद्र सरकार या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख / पडताळणी करतील.

या योजनेसाठी जे शेतकरी पात्र असतील अशा लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर थेट रक्कम सरकार जमा करणार आहे.

दिनांक १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत लाभार्त्यांच्या खात्यात प्रथम हप्ता जमा केला जाणार आहे.

PM Kisan सम्मान निधी योजनेसाठी अपात्र असणाऱ्या व्यक्ती

PM Kisan सम्मान निधी योजना ह्या योजनेचा लाभ मिळवण्या साठी सरकारने काही नियम बनवले आहेत, व नवीन अपडेट नुसार कोण या योजने साठी पात्र नसेल हे सांगितले आहे.

योजनेसाठी अपात्र असणाऱ्या व्यक्ती / कोणाला याचा लाभ मिळवता येणार नाही.

१. सर्व संस्थात्मक शेतकरी

२. असे शेतकऱ्यांचे कुटुंब ज्यांच्या घरामध्ये एक किंवा अधिक व्यक्ती खाली नमूद केलेल्या श्रेणीमध्ये /क्षेत्रामध्ये येतात .-

i ) क्षेत्र– इंजिनिअर , व्यावसायिक डॉक्टर, सी ए, वकील, वास्तुशास्त्रज्ञ

ii ) शेवटच्या वर्षी आयकर भरणारी व्यक्ती पात्र नसेल

iii ) दुसऱ्याची जमीन जर भाड्याने घेऊन कसत असणारी व्यक्ती या योजनेस अपात्र असेल

iv) आजी / माजी –

जिल्हा परिषद अध्यक्ष , महानगरपालिकेचे महापौर , आमदार , लोकसभा आणि राज्यसभा खासदार, मंत्री आणि राज्यमंत्री

v) केंद्र सरकार व राज्यसरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी

(वर्ग ४/ ग्रुप डी मधील कर्मचारी सोडून )

vi) जे केंद्र व राज्य सरकारमधील सेवा निवृत्त अधिकारी रुपये १० हजार पेक्षा अधिक पेन्शन घेत असतील अश्या अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.


३१ मार्च २०२१ पूर्वी करा आपली नोंदणी

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर ३१ मार्च पूर्वी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्या.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ( https://pmkisan.gov.in/) या संकेत स्थळाला भेट द्या.

नोंदणी केल्यानंतर होळी पर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रुपये २००० सरकार कडून जमा केले जातील .

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: