Saturday, September 30, 2023
Homeमहाराष्ट्रसर्वोच्च न्यायालयाचं विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस | Supreme Court notice to Speaker of...

सर्वोच्च न्यायालयाचं विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस | Supreme Court notice to Speaker of Legislative Assembly

Maharashtrasena News: शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात या नोटीसीला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

ठाकरे गटाचे आमदार तसंच मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या याचिकेत शिवसेनेच्या अपात्र आमदारांबद्दल विधानसभेच्या अध्यक्षांनी लवकर निर्णय घेण्यास निर्देश देण्याबाबत मागणी केली होती.

अपात्र आमदारांबाबत विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. पण अद्यापही अध्यक्षांनी याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याचं या याचिकेत म्हंटलं होतं.

 

Supreme Court notice to Speaker of Legislative Assembly

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!