Thursday, November 30, 2023
Homeराष्ट्रीयAndhra Pradesh Capital: विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल, आंध्र प्रदेशचे...

Andhra Pradesh Capital: विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांची घोषणा

Andhra Pradesh Capital: विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांची घोषणा

Maharashtrasena News : Andhra Pradesh New Capital

“विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल” असे आंध्र प्रदेशचे राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी स्वत: याची घोषणा केली आहे. मार्च महिन्यात विशाखापट्टणम येथे ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट चे आयोजन करण्यात येणार असल्याचे ही मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी त्यांनी सांगितले आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी विशाखापट्टणम शहर राज्याची राजधानी होणार असल्याची घोषणा केली आहे. “येत्या काळात आपली राजधानी असलेल्या विशाखापट्टणमला तुम्हा सर्वांना आमंत्रित करण्यासाठी मी आलो आहे. येत्या काही महिन्यांत मी विशाखापट्टणमला शिफ्ट होणार आहे.’ असे ते म्हणाले.

३ आणि ४ मार्च रोजी विशाखापट्टणम येथे जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परदेशी आणि देशी गुंतवणूकदारांनी आमच्याकडे यावे व आंध्र प्रदेश राज्यात व्यवसाय करणे किती सोपे आहे हे पहावे, असे आवाहन रेड्डी यांनी केले.

यापूर्वी जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणमला राज्य प्रशासनाची जागा म्हणून प्रस्तावित केले होते आणि आंध्र प्रदेश राज्याचे भवितव्य विकेंद्रित विकासामध्ये असल्याचे स्पष्ट केले होते. मुख्यालय म्हणून हे राज्याच्या राज्यपालांचा ही आधार असेल, तर विधिमंडळाचे कामकाज अमरावतीतून होणार आहे. १९५६ मध्ये तत्कालीन मद्रास राज्यापासून आंध्र वेगळे झाल्यानंतर एकेकाळी राजधानी असलेल्या कुरनूल येथे उच्च न्यायालय हलविण्यात येईल, असे ते आपल्या वक्तव्यात म्हणाले होते.

आंध्र प्रदेश राज्यभरात कार्यकारी, कायदेविषयक व न्यायालयीन कामकाजाच्या जागांचे वाटप केल्यास समन्यायी प्रादेशिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. तर देशात कोणतेही साम्य नाही. युवाजन श्रमिक रायतू काँग्रेस (वायएसआरसी) पक्षातील त्यांचे कट्टर समर्थक सांगतात की ते अनेक राजधानींच्या अनुभवांनी प्रेरित आहेत.

सण २०१४ मध्ये तेलंगणा आंध्र प्रदेशपासून वेगळा झाल्यानंतर हैदराबादला १० वर्षांसाठी दोन्ही राज्यांचे संयुक्त राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हैदराबाद तेलंगणाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थिती मध्ये आंध्र प्रदेशला २०२४ पूर्वी राजधानी जाहीर करावी लागली.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नवी दिल्लीत झालेल्या इंटरनॅशनल डिप्लोमॅटिक अलायन्स मीटमध्ये ही मोठी घोषणा केली.

यापूर्वी दिनांक २३ एप्रिल २०१५ रोजी चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपी सरकारने अमरावतीला आंध्र प्रदेशची पुढील राजधानी म्हणून घोषित केले होते.
त्यानंतर 23 मध्ये जगन सरकारने आंध्र प्रदेशला तीन राजधान्या असतील असे सांगितले होते. त्यापैकी अमरावती, विशाखापट्टणम आणि कुरनूल ची नावे समोर आली होती. मात्र, नंतर वायएसआर काँग्रेस सरकारने हा निर्णय मागे घेत अमरावतीला राजधानी बनवण्याची बोलणी केली होती.

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!