Tuesday, March 19, 2024
Homeराष्ट्रीयNarendra Modi : नरेंद्र मोदीं यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत केली...

Narendra Modi : नरेंद्र मोदीं यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत केली द्विपक्षीय चर्चा

महाराष्ट्रसेना ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात, पंतप्रधानांनी आज सिडनी इथं ,ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) यांची भेट घेतं यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली.

या बैठकी दरम्यान, दोन्ही देशात वैश्विक संबंध दृढ करण्याबाबत तसंच फुटीरतावादी कारवायांच्या संदर्भात चर्चा झाली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं .

त्यानंतर पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल डेव्हिड जॉन हर्ले ( General David John Hurley)यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, काल फोर्टेस्क्यु फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष, डॉ. ऍन्ड्रू फॉरेस्ट (Dr. Andrew Forrest ) यांनी त्यांची भेट घेतली. याशिवाय ऑस्ट्रेलियन सुपर केचे सीईओ पॉल श्रोडर (Paul Schroder)यांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतली.

हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात भारतीय कंपन्यांसोबत काम करण्याच्या, फोर्टेस्क्यू समूहाच्या योजनेचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी देखील पंतप्रधानांनी भेट घेतली आणि आपापल्या विचारांची देवाणघेवाण केली.

Narendra Modi hold bilateral talks with Australian Prime Minister Anthony Albanese
PM Modi
हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!