Maharashtrasena: स्वातंत्र्य संग्रामातले महान सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantraveer Vinayak Damodar Savarkar) यांचं योगदान, त्याग आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० वी जयंती नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात पहिल्यांदा होत आहे, ही अभिमानस्पद बाब आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) म्हटलं आहे.
नवी दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनातल्या सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
सावरकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाचं उदघाटन करण्यात आलं ही गौरवास्पद बाब असून यामुळे लोकशाही बळकट आणि वृद्धिंगत होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
या ऐतिहासिक वास्तूच्या उदघाटन कार्यक्रमाला विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आक्षेप घेतला हे दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राष्ट्रभक्तीचे तेजस्वी जाज्वल्य, क्रांतिवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी ट्विटद्वारे वीर सावरकरांना अभिवादन केलं आहे.