नव्या संसद भवनाच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं
Maharashtrasena:नव्या संसद भवनाच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण झालं. यासाठी आज पंतप्रधान नव्या संसद भवनाच्या दिशेनं रवाना झाले. यावेळी त्यांनी संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधींच्या पुतळयाला अभिवादन केलं.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यावेळी त्यांच्यासोबत होते. ओम बिर्ला यांनी देखील महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओम बिर्ला यांनी संसद भवनाच्या परिसरात होमहवन आणि पुजा केली. या पुजेनंतर तिथे उपस्थित असलेल्या विविध साधुसंतांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी वैदिक मंत्र्योच्चाराया घोषात सेंगोल हा राजदंड स्वीकारला. यावेळी तामिळनाडूमधून आलेल्या अधिनम संतांसह इतर पुरोहितांनी पंतप्रधानांना आशीर्वाद दिले.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या साधुसंतांसह नव्या संसद भवनात (new Parliament building) दाखल झाले. या ठिकाणी पंतप्रधानांनी सेंगोल हा राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या शेजारी स्थापित केला आणि त्याची पूजा केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील सेंगोलची पूजा केली. त्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांनी संसद भवनात उपस्थित असलेल्या साधुसंतांना वंदन करुन त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्यांनतर पंतप्रधानांनी (Narendra Modi)नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं. उद्घाटनानंतर नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी काम करणाऱ्या बांधकाम कर्मचारी आणि तंत्रज्ञानांचा पंतप्रधानांनी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी सर्वधर्मीय धर्मगुरूंनी प्रार्थना केल्या.
The new Parliament building was inaugurated by Prime Minister Narendra Modi.