Narendra Modi: नरेंद्र मोदी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून मायदेशी परतले
Maharashtrasena : जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मायदेशी परतले. यावेळी दिल्लीच्या पालम विमानतळावर पंतप्रधानांचं भव्य स्वागत करण्यात आलं. पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी केंद्रीय मंत्री, खासदार, भाजपा नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
भारताच्या जी-ट्वेंटी यजमानपदाची चहुबाजूनं प्रशंसा होत आहे, असं या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितलं. १४० कोटी देशवासियांना शिखरावर नेण्याचा संकल्प आहे, असं ते म्हणाले. ऑस्ट्रेलियामध्ये सर्वच पक्षांनी भारताच्या सेवकाचा सन्मान केला आहे. हे यश आपलं नसून १४० कोटी भारतीयांचं आहे असं त्यांनी सांगितलं.
Narendra Modi returned home after completing a successful tour of three countries namely Japan, Papua New Guinea and Australia