पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता-CM Eknath Shinde
महाराष्ट्रसेना ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत, पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या मंदिरांचं, डिजीटल मॅपींग करण्यात यावं असे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. यासाठी नगरविकास विभागानं तातडीने १० कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेला द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis), महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील या बैठकीला उपस्थित होते.
Approval of Pandharpur Temple Development Plan and Akkalkot Pilgrimage Development Plan-CM Eknath Shinde