Thursday, December 7, 2023
Homeराष्ट्रीयNarendra Modi : भारताला विकसित राष्ट्र बनवणं हे प्रत्येक भारतीयाचा स्वप्न -...

Narendra Modi : भारताला विकसित राष्ट्र बनवणं हे प्रत्येक भारतीयाचा स्वप्न – पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्रसेना ऑनलाईन : Narendra Modi

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या ऐतिहासिक संबंधाचा विस्तार खूप मोठा असून परस्पर विश्वास आणि आदर हा या संबंधाचा मूलाधार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये (Sydney) पंतप्रधानांनी आज भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. हा विश्वास आणि आदर निर्माण होण्यामध्ये भारतीय समुदायानं महत्वाची भूमिका बजावली आहे , असं ही ते म्हणाले.

दोन्ही देशांची संस्कृती भिन्न असली तरीही राष्ट्रकुल, क्रिकेट, योग आणि शिक्षण हे महत्वपूर्ण दुवे परस्परांना जोडून ठेवत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. ऑस्ट्रेलियात (Australia) राहत असलेला भारतीय समुदाय देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऑस्ट्रेलियामधेही जल्लोषात साजरा करण्यात आला. याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. भारताला विकसित राष्ट्र बनवणं हे प्रत्येक भारतीयाचा स्वप्न असल्याचं ते म्हणाले. भारतीय कोठे असले तरी, त्यांच्या मनात नेहमीच मानवधर्म जागृत असतो, हे जागतिक संकटाच्या काळात प्रत्येकवेळी सिध्द झालं आहे, असं ते म्हणाले. कोणावरही संकट येतं तेव्हा भारत तत्परतेनं मदतीसाठी सज्ज होत असल्यामुळे, जग भारताला फोर्स ऑफ ग्लोबल गुड म्हणून ओळखत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Prime Minister Narendra Modi, PM Modi, Narendra Modi

Making India a developed nation is the dream of every Indian – Prime Minister Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिडनीत कंपन्यांच्या सीईओंबरोबर चर्चा | Prime Minister Narendra Modi meets prominent Australian business leaders in Sydney – Maharashtrasena News

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!