Home महाराष्ट्र राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही -उद्धव ठाकरे | Uddhav Thackeray

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही -उद्धव ठाकरे | Uddhav Thackeray

0
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही -उद्धव ठाकरे | Uddhav Thackeray

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही -उद्धव ठाकरे | Uddhav Thackeray

आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दहावा स्मृतिदिन. आजच्याच दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेबांच निधन झालं होत व मुंबई नगरी स्तब्ध झाली होती. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त संपूर्ण ठाकरे कुटुंब व शिवसैनिकांनी मुंबईतील शिवाजीपार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केला. सर्वानी शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ” भारत जोडो यात्रा” (Bharat Jodo Yatra)दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचं ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सगळ्यांनाच प्रेम, जिव्हाळा आहे. मात्र त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करताना कुठेही बाजार होऊ नये, आणि त्यांच्या विचारांना साजेसं काम करावं, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. खासदार संजय राऊत, पक्षाचे नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई आणि अरविंद सावंत हे देखील यावेळी उपस्थित होते.

” राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, पण भाजपनेही राजकारण करु नये” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here