Monday, March 4, 2024
Homeराजकीय'राजगृह' या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली | Chief Minister...

‘राजगृह’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली | Chief Minister Eknath Shinde visited the residence of ‘Rajgriha’

‘राजगृह’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली | Chief Minister Eknath Shinde visited the residence of ‘Rajgriha’

Maharashtrasena News: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रदीर्घ काळ वास्तव्य असलेल्या, मुंबईत दादर इथल्या ‘राजगृह’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली.
यावेळी बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर येत्या रविवारी, २० तारखेला एकाच मंचावर येणार आहेत. परंतु या कार्यक्रमातून युतीच्या चर्चा पुढे जाण्याआधीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांचं प्रदीर्घ काळ वास्तव्य असलेल्या, मुंबईत दादर इथल्या ‘राजगृह’ या निवासस्थानी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यामुळे आता चर्चाना उधाण आले आहे.

‘राजगृह’ या निवासस्थानी प्रकाश आंबेडकर याच्या भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया –

“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाचं भूषण आहे. त्यांचं वास्तव्य असलेली ही वास्तू पाहिली व सदिच्छा भेट दिली,” एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “राजगृहाची ही इमारत बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उभी राहिली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आर्किटेक्चरची मदत न घेता कोणत्याही खांबाशिवाय ही इमारत उभी केली.” राजगृहमध्ये बाबासाहेबांच्या वाचनाची खोली, बसण्याची खुर्ची, अभ्यासाचा टेबल, सर्व पुस्तकं आणि इतर सर्व बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू पाहिल्या. त्या वस्तू आजही जशाच्या तशा आहेत. हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. तो आज मला मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळाला,” असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये, कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया –

या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत इंदू मिलच्या जागेवर प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका विषयी चर्चा झाली असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितलं.

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!