Skyroot Aerospace launched Vikrant -S: भारताचा पहिला खाजगी अग्निबाण आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपित

Skyroot Aerospace launched Vikrant -S: भारताचा पहिला खाजगी अग्निबाण आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपित

Maharashtrasena News: Skyroot Aerospace launched Vikrant -S: भारताचा पहिला खाजगी अग्निबाण आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपित

भारत अंतराळ संशोधन आणि प्रक्षेपण क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करत असून याद्वारे यशाची नवी शिखरं काबीज करणं शक्य होणार आहे, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra sinh) यांनी म्हटलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं (ISRO) आज श्रीहरीकोटा इथून पहिल्या खासगी उपग्रहाचं (India’s first private rocket) प्रक्षेपण करून नवा इतिहास निर्माण केला.

संपूर्ण भारतीय बनावटीच्या स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडनं (Skyroot Aerospace Pvt Ltd) तयार केलेल्या विक्रम (Vikrant -S )अर्थात व्ही के एस रॉकेट चं आज काही वेळापूर्वी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (Skyroot Aerospace Private Limited) या खाजगी स्टार्ट अप (Startup) कंपनीनं, व्‍ही के एस अग्निबाण विकसित केला. हा एकच टप्पा असलेला, सिंगल स्टेज स्पिन स्टेबिलाइज्ड सॉलिड प्रोपेलंट अग्निबाण (Rocket) आहे. या प्रक्षेपणासाठी इस्रोसोबत सामंजस्य करार करणारी स्कायरूट, ही पहिली स्टार्टअप कंपनी आहे.
अग्निबाणाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. अंतराळ क्षेत्रात भारतानं नवी सुरुवात कंली आहे. अंतराळ परिसंस्था आणि स्टार्टअप परिसंस्था विकसित करण्याच्या दिशेने हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं.
इसरोमध्ये (ISRO) खासगी क्षेत्राच्या प्रवेशामुळे मोठं परिवर्तन घडत आहे. आगामी काळात अंतराळ क्षेत्रात सरकारी -खासगी भागीदारीमुळे अंतराळ क्षेत्राला मोठा लाभ होईल असं इसरोचे अध्यक्ष एस. सोमनाथ (S Somnath)म्हणाले.

Leave a Comment