नवी दिल्लीत “एमएसएमई दालना”चं केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याहस्ते उद्घाटन | Union Minister Narayan Rane inaugurates MSME Pavilion at India International Trade Fair 2022
Maharashtrasena News: नवी दिल्लीत आयोजित 41व्या आयआयएफटी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2022 (India International Trade Fair 2022) मधल्या “एमएसएमई दालना”चं उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभाग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या हस्ते काल झालं. केंद्रीय एमएसएमई (MSME) राज्यमंत्री भानू प्रताप वर्मा (Bhanu Pratap Varma)देखील या प्रसंगी उपस्थित होते.
नवी दिल्ली (New Delhi)येथील प्रगती मैदानावर हॉल क्रमांक 4 मध्ये हे “एमएसएमई दालन” उभारण्यात आले आहे. या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या माध्यमातून, एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांना, विशेषतः महिला उद्योजक, अनुसूचित जाती आणि जमातींमधील उद्योजक, आकांक्षित जिल्ह्यांमधील उद्योजक यांना त्यांची कौशल्य तसंच उत्पादनं प्रदर्शित करण्याची संधी मिळेल त्याद्वारे विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याची व स्वावलंबी होण्याची संधी मिळेल, असं नारायण राणे (Narayan Rane) यावेळी म्हणाले.
याशिवाय ‘व्होकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल’ असा संदेश देणाऱ्या खादी इंडिया पॅव्हेलियनचे उदघाटन देखील नारायण राणे (Narayan Rane) यांच्या हस्ते झालं.
या दालनात पश्चिम बंगालची मलमल, बनारसी सिल्क, जम्मू आणि काश्मीरची पश्मिना, भागलपुरी सिल्क, गुजरातची पटोला रेशीम, पंजाबची फुलकरी, आंध्र प्रदेशची कलमकारी आणि पुंडुरू खादी उत्पादनं आणि इतर अनेक प्रकारचे कापूस, रेशीम आणि लोकरीचे कपडे प्रदर्शित केले जात आहे.
खादी इंडिया पॅव्हेलियनने खादी संस्थांच्या माध्यमातून खादी कारागीरांच्या सहभागासाठी 200 हून अधिक स्टॉल्स उभारले आहेत, पंतप्रधानांच्या रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (पीएमईजीपी) स्थापन केलेल्या युनिट्स आणि देशभरातून एसएफयूआरटीआय क्लस्टर अंतर्गत स्थापन केलेल्या युनिट्स, उत्कृष्ट हस्तकलेच्या खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन केले आहे.