Bharat Jodo Yatra: भारत जोडो- नफरत छोडो ही यात्रा आज सकाळी हिंगोली जिल्हयातून वाशीम जिल्हयात दाखल

Bharat Jodo Yatra: भारत जोडो- नफरत छोडो ही यात्रा आज सकाळी हिंगोली जिल्हयातून वाशीम जिल्हयात दाखल

Maharashtrasena News: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीहून निघालेली भारत जोडो- नफरत छोडो (Bharat Jodo Yatra) ही यात्रा आज सकाळी हिंगोली जिल्हयातून वाशीम जिल्हयात दाखल झाली. यावेळी वाशीम जिल्हयाच्या सीमेवर पैनगंगा नदीच्या तीरावर यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचं जिल्हा काँग्रेसच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. यावेळी पारंपरिक बंजारा नृत्य, आदिवासी नृत्यं सादर करण्यात आलं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), वाशीमचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक, प्रदेश कार्यकारिणी सरचिटणीस दिलीप सरनाईक उपस्थित होते.
आज सायंकाळी वाशीम शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात राहुल गांधी जाहीरसभेत भाषण करणार आहेत. रात्रीच्या मुक्कामानंतर उद्या ही भारत जोडो यात्रा मालेगावमार्गे अकोला जिल्हयाकडे मार्गस्थ होणार आहे.


 

Leave a Comment