पुण्यात मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिजवर काल रात्री एका भरधाव टँकरनं ४८ वाहनांना धडक दिली | Pune Navale Bridge Accident 48 vehicles Crash

पुण्यात मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिजवर काल रात्री एका भरधाव टँकरनं ४८ वाहनांना धडक दिली | Pune Navale Bridge Accident

Maharashtrasena News: पुणे शहरातल्या बाहय वळणावरुन जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिजवर (Pune Navale Bridge Accident) काल रात्री एका भरधाव टँकरनं ४८ वाहनांना धडक दिली. याअपघातात सात ते आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात (Accident) किरकोळ जखमी झालेल्या ३५ ते ४० जणांनाउपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी पोलिसांना या अपघाताविषयी तत्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. अपघात नेमका कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते तपासावं आणि अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर (Mumbai-Banglore Highway) झालेल्या या अपघातात टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झल्याची प्राथमिक माहिती आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!