President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु झारखंडच्या दौऱ्यावर
Maharashtrasena news:राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) झारखंडच्या दौऱ्यावर असून त्या आज खुंटी इथल्या बिरसा मुंडा महाविद्यालयात आयोजित बचत गटांच्या संमेलनात सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी ५०० बचत गटांच्या सुमारे २५ ते ३० हजार महिलांना संबोधित केलं. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आपली प्रगती करता येत आहे आणि याचा आनंद इथल्या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे, असं सांगत त्यांनी समाधान व्यक्त केलं.
केवळ शेतीवर अवलंबून न राहता बचतगटांच्या मदतीनं या महिला इतर राज्यांच्या महिलांपेक्षाही पुढे जाऊ लागल्या आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदिवासी समाजातल्या महिलांमध्ये उपजीविका आणि आरोग्यावर जनजागृती करण्याच्या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रपतींनी (President Draupadi Murmu) डेमो बूथ आणि स्टॉलची देखील पाहणी केली.
आदिवासी व्यवहार मंत्रालयानं भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास संघ आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास निगम यांच्या सहकार्यानं या संमेलनाचं आयोजन केलं आहे.
President Draupadi Murmu visits Jharkhand