Union Minister Nitin Gadkari : मुंबईत ग्रीन हायड्रोजन कॉन्क्लेव्हचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी त्यांच्या हस्ते उद्घाटन

Maharashtrasena: सध्या जीवाश्म इंधनाची आयात आणि प्रदूषण ही दोन मोठी आव्हानं असून देशातल्या प्रदूषणाच्या समस्येची तीव्रता खूपच जास्त असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितलं आहे. मुंबईत ग्रीन हायड्रोजन कॉन्क्लेव्हचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.

देशातल्या प्रदूषणाची समस्या खूप जास्त आहे आणि दुसरीकडे आपलं दरडोई उत्पन्न इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार्यता महत्त्वाची ठरत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

वाढत्या प्रदूषणाच्या समस्या पाहता सर्व क्षेत्रात आपली शक्ती मजबूत करण्यासाठी आणि कमकूवतपणाचं शक्तीमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कृषी क्षेत्राला ऊर्जा आणि वीजनिर्मिती क्षेत्राशी जोडल्यास आपण रोजगार निर्मिती करु शकतो. आगामी पाच वर्षांत भारतानं १५ लाख कोटींच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात पहिले स्थान मिळवण्याचे स्वप्न ते पाहत असल्याचं ते म्हणाले.

 

Union Minister Nitin Gadkari inaugurated Green Hydrogen Conclave in Mumbai

Community-verified icon

Leave a Comment

error: Content is protected !!