Monday, March 4, 2024
Homeक्रीडाIndia vs New Zealand, 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड- तीन एकदिवसीय क्रिकेट...

India vs New Zealand, 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड- तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेतला खेळला गेलेला दुसरा सामना पावसामुळे रद्द

भारत आणि न्यूझीलंड- तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेतला खेळला गेलेला दुसरा सामना पावसामुळे रद्द

Maharashtrasena News: India vs New Zealand, 2nd ODI

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेतला हॅमिल्टन इथं आज खेळला गेलेला दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. न्यूझीलंडनं (New Zealand) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात झाली, मात्र ४ षटकांनंतर पाऊस पडू लागल्यानं, खेळ थांबवण्यात आला, तेव्हा भारताच्या नाबाद २२ धावा झाल्या होत्या..पावसाच्या व्यत्ययायामुळे सामना २९ षटकांचा करण्यात आला.
पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला, आणि भारताचा सलामीवीर कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) ३ धावांवर झेलबाद झाला.

भारताच्या १२ षटकांत १ बाद ८९ धावा झाल्या होत्या, तेव्हा पावसाचा पुन्हा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवला गेला, आणि सामना रद्द म्हणून घोषित करण्यात आला.

पहिला सामना न्यूझीलंड संघानं जिंकत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली आहे, तर आजचा सामना रद्द झाला त्यामुळे मालिका बरोबरीत सुटण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकणं अनिवार्य आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी वन-डे : पावसामुळे सामना रद्द, न्यूझीलंड मालिकेत १-० ने आघाडीवर

India vs New Zealand 2nd ODI: Match Abandoned Due to Rain, New Zealand Lead Series 1-0

india-vs-new-zealand-2nd-odi-match-abandoned-due-to-rain-new-zealand-lead-series-1-0

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!