India vs Australia 2nd T20I : भारतीय संघाचा 6 विकेट्सने विजय, मालिकेत 1-1 ची बरोबरी

नागपूर : नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा t20 ( India vs Australia 2nd T20I ) सामना खेळला गेला, या सामन्यांमध्ये भारतीय संघाचा सहा विकेट राखून विजय झाला. पावसामुळे फिल्डवर ओलावा असल्यामुळे हा सामना अडीच तास उशीरा उशिरा सुरू करण्यात आला व या सामन्यांमध्ये 8-8 ओव्हर खेळल्या गेल्या.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलिया संघाने आठ षटकांमध्ये मध्ये 5 बाद 90 अशी मजल मारली. मॅथ्यू वेड ने नाबाद 43 धावा केल्या त्यामध्ये त्याने चार चौकार व तीन षटकार ठोकले;  आरोन फिंच ने 15 चेंडूत 31 धावा केल्या. गोलंदाजी करत असताना अक्षर पटेल ने दोन विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलिया 90/5 ( 8 ओव्हर ).

भारतीय संघासमोर 91 धावांचे लक्ष होते

ओपनिंग साठी उतरलेल्या कर्णधार रोहित शर्माने  20 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या यामध्ये त्याने 4 षटकार, 4चौकार मारले. ओल्या आउटफिल्डमुळे एका बाजूने आठ षटके कमी करण्यात आलेल्या सामन्यात भारताला चार चेंडू राखून ९१ धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी त्याने एकहाती मदत केली. केएल राहुल (१०), विराट कोहली (11), सूर्यकुमार यादव (0), हार्दिक पंड्या  (11), दिनेश कार्तिक 10 (2 चेंडू 1 Six, 1 Four).

भारत 92/4 ( 7.2 ओव्हर )

रोहित शर्माने रचला इतिहास, टी-20 क्रिकेटमधला ठरला सिक्सर किंग

T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

रोहित शर्मा -138 सामने -176 षटकार

मार्टिन गुप्टिल-121 सामने -172 षटकार

क्रिस गेल -79 सामने -124 षटकार

ऑर्गन मॉर्गन -115 सामने -120 षटकार

India vs Australia 2nd T20I

मालिकेत 1-1 ची बरोबरी.

दोन्ही संघ आता रविवारी मालिकेतील निर्णायक तिसर्‍या T20 सामन्यासाठी हैदराबादला जातील.

 India vs Australia 3rd T20I : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया निर्णायक सामना  

Leave a Comment