Raju Srivastav : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन.

Raju Srivastav
Raju Srivastav
ad3

Raju Srivastav: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन.

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे निधन झाले आहे. दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर गेल्या 42 दिवसांपासून उपचार सुरु होते. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांची प्राणजोत मालवली. एक प्रसिद्ध कलाकार, स्टँडअप कॉमेडीचा बादशहा काळाच्या पडद्याआड गेला.

10 ऑगस्ट 2022  रोजी जिममध्ये वर्कआऊट करत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या 42 दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्यांची प्रकृती खूपच चिंताजनक होती. हृदय विकाराच्या झटका आल्यानंतर पंधरा दिवसांनंतर ते कोमातून बाहेर आले होते. परंतु वयाच्या 58 व्या वर्षी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या दोन दशकं पासून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते, खूप मनोरंजन केले. स्टँडअप कॉमेडीचा बादशाह काळाच्या पडद्याआड झाल्याने चाहत्यांना आणि बॉलिवुडला मोठा धक्का बसला आहे.