Thursday, November 30, 2023
Homeमहाराष्ट्ररायगड : प्रासोल केमिकल्स कंपनीत वायूगळती एकाचा मृत्यू झाला तर २ जणांची...

रायगड : प्रासोल केमिकल्स कंपनीत वायूगळती एकाचा मृत्यू झाला तर २ जणांची प्रकृती गंभीर | Raigad

रायगड : प्रासोल केमिकल्स कंपनीत वायूगळती एकाचा मृत्यू झाला तर २ जणांची प्रकृती गंभीर | Raigad

Raigad News: रायगड जिल्हयातल्या महाड येथे औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रासोल केमिकल्स कंपनीत काल सायंकाळी वायूगळती झाल्यानं एकाचा मृत्यू झाला. तर २ जणांची प्रकृती गंभीर आहे. जितेंद्र आडे ( वय ४०) राहणार-वालन,बौद्धवाडी (कॉन्ट्रेक्ट लेबर)असे मृत मजुराचे नाव आहे तर मिलिंद मोरे व प्रशांत किंकळे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर महाड येथील देशमुख नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत.
वायूगळतीचं अद्याप कारण समजू शकलं नाही. मात्र कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचं तिथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक होत कंपनीच्या समोर प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. या कंपनीवर कारवाई करुन नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीला कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!