Home क्रीडा FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सौदी अरब संघानं अर्जेंटिना संघाचा २-१ अशा गोल फरकानं केला पराभव

FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सौदी अरब संघानं अर्जेंटिना संघाचा २-१ अशा गोल फरकानं केला पराभव

0
FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सौदी अरब संघानं अर्जेंटिना संघाचा २-१ अशा गोल फरकानं केला पराभव

FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सौदी अरब संघानं अर्जेंटिना संघाचा २-१ अशा गोल फरकानं केला पराभव

Maharashtrasena News: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ (FIFA World Cup 2022) फुटबॉल स्पर्धेत काल अनपेक्षित निकालाची नोंद झाली. बलाढ्य अर्जेंटिनाला या स्पर्धेत सर्वात तळाच्या क्रमावर असलेल्या सौदी अरेबियानं २-१ असा पराभवाचा धक्का दिला. तब्बल ३६ सामन्यात अपराजित राहिलेल्या अर्जेंटिनाच्या विजयाची मालिका या निकालामुळे खंडित झाली.

या सामन्यात अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेसीनं पेनल्टी किकवर पहिला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मध्यंतरापर्यंत कायम होती. मात्र, उत्तरार्धात अचानक सौदी अरेबियानं एकामागोमाग एक आक्रमणं करून दोन गोल करत अर्जेंटिनाला चकित केलं. त्यापूर्वी या स्पर्धेत गतविजेत्या फ्रान्सनं साखळी फेरीतल्या आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४-१ नमवत विजयी सलामी दिली. तर डेन्मार्क आणि ट्युनिशिया आणि पोलंड आणि मेक्सिको याच्यातले सामने गोलशून्य बरोबरीत सुटले.

दरम्यान, फिफा स्पर्धेच्या मध्ये विख्यात फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं इंग्लंडचा फूटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड संघ सोडण्याचा निर्णय घेतला.

मॅन्चेस्टर युनायटेडनं यासंबंधित प्रसिद्ध पत्रक जारी करून माहिती दिली. संघ सोडण्याबाबच रोनाल्डो (Ronaldo) आणि संघात चर्चा झाल्याचं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. एका मुलाखतीनंतर रोनाल्डोवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्यानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे.

 

FIFA World Cup 2022: Saudi Arabia vs Argentina

fifa-world-cup-2022-saudi-arabia-beat-argentina-2-1-in-the-fifa-world-cup-football-tournament

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here