India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड – टी-२० क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्यय, डकर्वथ लुईस नियमानुसार सामना बरोबरीत.
Maharashtrasena News: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand T20) यांच्यात नेपियर इथं खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी- २० क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानं डकवर्थ लुईस नियमानुसार सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका भारतानं १-० अशा फरकानं जिंकली.
न्यूझीलंडनं दिलेलं १६१ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात काहीशी अडखळतच झाली होती , सलामीवीर इशान किशन १० आणि रिषभ पंत ११ धावा करून बाद झाले. त्यापाठोपाठ श्रेयस अय्यरही शून्यावर आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) १३ धावा करत तंबूत परतला.
हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नाबाद ३३ धावांच्या जोरावर भारताच्या ९ षटकात चार बाद ७४ धावा झाल्यावर पावसाचा व्यत्यय आला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे सामन्याचा निकाल घोषित करण्यात आला. त्यापूर्वी न्यूझीलंडने डेव्हेन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्सच्या अर्धशतकी खेळीमुळे न्यूझीलंडनं १६० धावा केल्या.
अर्षदिप सिंग (Arshdeep Sing)आणि मोहम्मद सिराजनं (Mohammad Siraj)प्रत्येकी चार गडी बाद केले. मोहम्मद सिराज सामनावीर ठरला तर सूर्यकुमार यादवला मालिकावीराचा किताब देण्यात आला.
india-vs-new-zealand-t20-cricket-match-rain-interruption-in-match-tied-according-to-duckworth-lewis-rule