Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यात निधन

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यात निधन

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यात निधन

Maharashtrasena News: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं आज पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. गोखले यांचं पार्थिव पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर (Bal Gandharva Ranga Mandir) इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून, संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी या तिन्ही माध्यमातून त्यांनी काम केलं होतं. बॅरिस्टर, जावई माझा भला, कमला, समोरच्या घरात ही त्यांची काही गाजलेली नाटकं. याचसोबत कळत नकळत, लपंडाव वजीर, महानंदा, माहेरची साडी, भिंगरी, मुक्ता, वासुदेव बळवंत फडके,नटसम्राट या मराठी आणि १९९० चा अग्निपथ, थोडासा रुमानी हो जाये, खुदागवाह, हम दिल दे चुके सनम, हे राम ,भूलभुलय्या, हिचकी, मिशन मंगल या हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका रसिकांच्या विशेष लक्षात राहिलेल्या. १९७१ मध्ये परवाना या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. अलिकडच्याच गोदावरी या मराठी चित्रपटातही त्यांची भूमिका होती. याखेरीज अकबर बिरबल, उडान, विक्रम-वेताळ, अग्निहोत्र या त्यांच्या दूरचित्रवाणीवरील काही गाजलेल्या मालिका होत्या.

अनुमती या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

 

 

veteran-actor-vikram-gokhale-passes-away-in-pune

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!