Monday, April 7, 2025
Homeमहाराष्ट्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ | 62nd Convocation...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ | 62nd Convocation of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ | 62nd Convocation of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

Maharashtrasena News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) ६२ वा दीक्षांत समारंभ आज औरंगाबाद इथं झाला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना डिलीट ही मानद पदवी, विद्यापीठाच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रदान केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) हे महाराष्ट्रातलं ऐतिहासिक विद्यापीठ आहे. गतकाळात मराठवाड्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होत नसताना बाबासाहेब आंबेडकरांनी याकडे लक्ष देऊन या भागात शिक्षणाची गुढी उभारली, त्यामुळेच आपण शिक्षण क्षेत्रात पुढे गेलो, असं मत शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

एखादा प्रदेश सुखी, समृद्ध आणि संपन्न होण्यामध्ये तसंच सामाजिक आणि आर्थिक दृष्टीनं प्रगतीशील होण्यासाठी, त्या भागातली महाविद्यालयं तसंच विद्यापीठांची महत्त्वाची भूमिका असते असं मत, नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं. विद्यापीठांनी त्या त्या भागामध्ये भौगोलिक स्थिती आणि आवश्यकतेनुसार संशोधन करण्यात अग्रेसर रहावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपापल्या भागामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी, शिक्षणामध्ये गुणात्मक फरक करण्याकरता तसंच त्या भागातल्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी काय केलं पाहिजे याचा दृष्टीकोन विद्यापीठांनी मांडणं अपेक्षित आहे. प्रगतीशील, समृद्ध मराठवाडा निर्माण करण्य़ासाठी हे विद्यापीठ निश्चित महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!