दुर्ग संवर्धन म्हणजे काय !!( What is Fort Conservation)

 दुर्ग संवर्धन म्हणजे काय !! ( Fort Conservation)

 महाराष्ट्र सेना ऑनलाईन: दुर्ग संवर्धन म्हणजे काय !! ( Fort Conservation). दुर्ग संवर्धन याबद्दल थोडक्यात माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.

दुर्ग संवर्धन

आपल्या महाराष्ट्रात जवळपास चारशेच्या आसपास गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्यांचे चार ते पाच प्रकारे वर्गीकरण करता येतं. त्यात स्थलदुर्ग ,जलदुर्ग गिरीदुर्ग, वनदुर्ग व किनारी दुर्ग असे प्रकार येतात

आपल्याकडे दोन विभागाकडून गड-किल्ल्यांचे संवर्धन केले जाते त्यात (ASI) आरकॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भारतीय( केंद्रीय )पुरातत्व विभाग तसेच (SA) राज्य पुरातत्त्व विभाग यामार्फत संवर्धन केले जाते.

सद्यस्थितीला केंद्र विभागाकडे 43 किल्ले आहेत त्यात रायगड., शिवनेरी ,जंजिरा ,तर राज्य पुरातत्त्व विभागाकडे 48 किल्ले आहे त्यात राजगड , कोरीगड ,सिंहगड ,तोरणा आहे त्यात CSR फंडातून किल्ले दत्तक योजना देखील आहे .

त्यात 5 लाख भरून किल्ला दत्तक घेता येतो परंतु त्यावर राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियमा नुसार काम करावे लागते .

किल्ला किंवा दुर्ग संवर्धन करताना तो किल्ला कोणाच्या ताब्यात आहे ,त्याचा सातबारा त्याची मिळकत त्याचा हक्क कोणाच्या नावावर आहे याची माहिती घेणे गरजेचे असते ज्या किल्ल्यावर आपण संवर्धन करणार आहोत त्याची रीतसर परवानगी राज्य पुरातत्व विभागाला करणे गरजेचे आहे.

अशा कामांना राज्य पुरात्तव विभाग त्यांच्या नियमानुसार तात्काळ काम करण्यास परवानगी देते. किल्ल्यावर जाऊन आपण काय काम करणार आहोत त्याची सविस्तर माहिती त्या अर्जामध्ये असावी .

शक्यतो संवर्धन करणारी संस्था रजिस्टर असावी जेणें करून त्या संस्थेतील लोकांचे कांटेक्ट डिटेल राज्य पुरात्तव विभागाकडे राहतिल .राज्य पुरातत्व विभागाचे कार्यालय पुणे, मुंबई ,नाशिक, औरंगाबाद ,नागपूर व रत्नागिरी येथे आहेत या ठिकाणी त्या विभागातुन तुम्ही रीतसर अर्ज करू शकता.

परवानगी मिळाल्यानंतर ज्या वास्तुचे संवर्धन करणार आहोत ती वास्तू काय आहे, कोणती आहे त्याचा डिटेल अभ्यास केला पाहिजे .भावनिक न होता प्रॅक्टिकली विचार करुनच संवर्धन केल पाहिजे.

जर एखाद्या किल्ल्याचे किंवा तेथील वास्तूचे एखादे जून स्केच ,ड्रॉइंग किंवा फोटो उपलब्ध असेल तर ती वस्तू जुन्या पद्धतीने संवर्धित करू शकतो किंवा बांधण्याचा विचार करू शकतो उदाहरणार्थ राजगड किल्ल्यावर बांधली गेलेली महाराजांची राजसदर होय.

किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या असतात आज्ञापत्रात असा उल्लेख आहे उदक पाहून किल्ला बांधावा त्यामुळे पाण्याचे महत्व खूप आहे किल्ल्यावरती कोणत्या प्रकारची पाण्याची टाकी आहे त्यातील गाळ काढून पाणी स्वच्छ ठेवले पाहिजे किंवा बुरुजावरील ,तटावरील गवत काढून ते साफ केले पाहिजे.
काढलेला कचरा काढून त्यावर भाज्या पिकवाव्या असा नियम होता आणि सर्व कामें किल्ल्यावर हवालदार करत असत.

किल्ल्यावरील झाडे तोडणे किंवा पाण्याच्या टाक्या साफ करणे दगड रचने म्हणजे संवर्धन झालं का तर याच बरोबर तुम्ही अजुन आधुनिक काम करू शकता यामध्ये

दुर्ग संवर्धन !!

1) किल्ल्याच्या परिसर डिटेल मॅपिंग करणे

2) किल्ल्यावरती असणारे अवशेष त्यांचे डिटेल डॉक्युमेंटेशन करणे

3) किल्ल्याचे नकाशे तयार करणे .

4) किल्ल्यावरती विविध प्रकारचे माहिती व मार्गदर्शक फलक लावणे इत्यादी गोष्टी करू शकतो .

5) त्याचबरोबर स्थानिक लोकांमध्ये जागरूकता तयार करणे .

6) किल्ल्यावरील अपप्रवृतिनां आला घालनन.

7) किल्ल्याचे ऐतिहासिक , भौगोलिक व संरक्षण दृष्ट्या महत्त्व पटवून देणे या गोष्टी आपण करू शकतो .

8) किल्ल्याच्या परिसरात झाडे लावणे .

राज्य पुरातत्व विभाग एकदा संवर्धन करून गेले की पुढे आपली किल्ला मेंटेन ठेवण्याची जबाबदारी आपली असेल .
किल्ल्यावर असणारे इतर अवशेष उदा. तोफा, मंदिरे, शिल्प ,मुर्त्या, यांचादेखील ऐतिहासिक व शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केला पाहिजे . याविषयी सविस्तर चर्चा करता आली.

धन्यवाद!!
– अनिल दुधाने.


 दुर्ग संवर्धन म्हणजे काय !! ( Fort Conservation)

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: