Home राजकीय शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात, सुषमा अंधारे यांचा दावा

शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात, सुषमा अंधारे यांचा दावा

33

शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात, सुषमा अंधारे ( Sushma andhare)यांचा दावा

महाराष्ट्र सेना न्यूज : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) हे आमच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा ठाकरे गटातील उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जळगाव येथे महाप्रबोधन यात्रेदरम्यान केला आहे. कधी कधी माणसे बेईमान होतात मात्र परतीचे दोर आमच्याकडून कापले गेलेले नाहीत, मातोश्री सर्वाना जवळ करते.असेदेखील सुषमा अंधारे (Sushma andhare) यावेळी म्हणाल्या.

महाप्रबोधन यात्रेदरम्यान शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे त्यांच्या गटात नाराज असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. ते ठाकरे गटात परत येणारे पहिला आमदार राहू शकतात, असे मला वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.

शिंदे गटातून संजय शिरसाट परत येणारे पहिले आमदार असणार आहे असा दावा त्यांनी केला आहे. संजय शिरसाठ यांची ना मंत्रिपदात ना कार्यकारणीत वर्णिली लागली आहे. त्यामुळे ते नाराज आहेत. शिंदे गटात जाऊन सर्वात जास्त पश्चाताप संजय शिरसाट याना होत असल्यामुळे ते लवकरच ठाकरे गटात येणार असल्याचे सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

” परतीचे दोर आमच्या कडून कधीही कापले गेले नाहीत. मातोश्री सर्वाना जवळ करते. मला वाटते शिंदे गटातील पहिल्यांदा परत येणारे कोण असतील तर या घडीला तर ते संजय शिरसाठ साहेब असतील. कारण संजय शिरसाठजी आता प्रचंड अस्वस्थ आहेत, परेशान आहेत, ना मंत्री मंडळात वर्णी लागली; उलट संभाजीनगर मध्ये अब्दुल सत्तार, अतुल सावे आणि संदिपान भुमरे अशा तिन्ही लोकांना मंत्रीपदे देऊन त्यांच्या मंत्री पदाची संपूर्ण आशा मावळली. शिंदे गटाकडून कार्यकारणी ची पदे जाहीर झाली, त्यातही संजय शिरसाठ यांना काहीच स्थान मिळालं नाही, त्यामळे सर्वात ज्यास्त पश्चाताप जर कोणाला होत असेल तर तो संजय शिरसाठ यांना होतोय. माज्या माहिती प्रमाणे संजय शिरसाठजी बऱ्या पैकी आमच्या संपर्कात आहेत.” असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे आता शिंदे गटातून कोणी येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

error: Content is protected !!