Monsoon session of Parliament 2023: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक
Maharashtrasena News: संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon session 2023) आजपासून पासून सुरु होत आहे. त्यानिमित्तानं काल केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. या बैठकीला ३४ पक्षांचे ४४ नेते उपस्थित होते.
मणिपूर हिंसाचार, महागाई देशातली पूर परिस्थिती यावर सदनात चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी या बैठकीत केली. तर या अधिवेशनात एकूण ३१ विधयेक सदनात मांडली जाणार असून सुमारे १७ बैठक होतील असं सत्ताधारी पक्षानं सांगितलं.
संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रह्लाद जोशी यांनी या बैठकीत केलं. अधिवेशनात मणिपूर प्रश्न, महागाई, देशातली पूर परिस्थिती यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचं जोशी यांनी सांगितलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon session of Parliament)सु रु होण्यापूर्वी सदनातली रणनीती ठरवण्यासाठी रालोआ ची देखील एक बैठक सुरु आहे.. या बैठकीला केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, रामदास आठवले यांच्यासह रालोआचे अनेक नेते उपस्थित आहेत.
Monsoon session 2023,
Monsoon session of Parliament,
Monsoon session, Monsoon session of Parliament 2023
Monsoon session of Parliament: An all-party meeting chaired by Rajnath Singh on the eve of the monsoon session of Parliament