TATA IPL final CSK VS GT: आयपीएल क्रिकेटस्पर्धेत अंतिम सामन्यात गुजरातटायटन्सला नमवून चेन्नईसुपरकिंग्स संघानं पटकावलं विजेतेपद

Maharashtrasena news: Chennai Super Kings vs Gujarat Titans,

CSK vs GT, Final, Indian Premier League 2023

इंडिअन प्रिमिअर लीग (Indian Premier League 2023)अर्थात आयपीएल (IPL) क्रिकेट स्पर्धेत अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघानं (Chennai Super Kings ) गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला ५ गडी राखून नमवत, पाचव्यांदा आयपीएल करंडावर आपलं नांव कोरलं.

अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी मैदानावर नाणेफेक जिंकून चेन्नईनं (CSK) गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. साई सुदर्शनच्या तडाखेबाज ९६ धावांच्या जोरावर गुजरातनं निर्धारित २० षटकात २१४ धावा केल्या. मात्र, पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यावर चेन्नई सुपर किंग्जसमोर १५ षटकांत १७१ धावां करण्याचं सुधारित लक्ष्य ठेवण्यात आलं. याचा पाठलाग करताना, अंतिम षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर अनुक्रमे षटकार आणि चौकार फटकावत चेन्नई सुपर किंग्जनं धावांचं लक्ष्य पार केलं.

शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने केलेली फलंदाजी निर्णायक ठरली. डेवॉन कॉनवे सामनावीर ठरला.

एमएस धोनीने आणखी एक आयपीएल हंगाम खेळण्याची शक्यता नाकारली नाही

एमएस धोनी खात्री नाही आणि पुढील 6-7 महिन्यांत त्याचे शरीर कसे प्रतिसाद देते ते पाहू इच्छित आहे; पण चेन्नई सुपर किंग्ज’ कर्णधाराने दुसरा हंगाम खेळण्याची शक्यता नाकारली नाही इंडियन प्रीमियर लीग आणि त्याच्या चाहत्यांसाठी “ही भेट असेल” असे सांगितले ज्यांनी त्याला आपल्या प्रेमाने भावनिक केले आहे.

Leave a Comment