India vs new zealand : शुभमन गिल चे दमदार शतक
Maharashtrasena News: India vs new zealand first ODI,
Shubman gill century against new zealand
भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs Nz) सामन्यात अवघ्या ८७ चेंडूंमध्ये शुभमन गिल ने शतक झळकावले. युवा क्रिकेटर भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल हा अवघ्या २३ वर्षाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला भारतासाठी ओपनिंग करण्याची संधी मिळाली, व त्याने उत्कृष्ट पद्धतीने सतत चांगला खेळ दाखवून भारतीय संघासाठी योगदान दिले आहे.
शुभमन गिल चे हे तिसरे एकदिवशीय शतक आहे.
अवघ्या १९ एकदिवशीय सामन्यांमध्ये सर्वाधिक जलद १००० धावा पूर्ण केले; व तो आता सर्वाधीक जलद १००० धावा पूर्ण करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. यामध्ये ५ अर्ध-शतके तर ३ शतकांचा समावेश आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (india vs new zealand), एकदिवसीय पहिला क्रिकेट सामना आज बुधवार, १८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी 1:30, (IST) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) येथे.
शुभमन गिलने या सामन्यांमध्ये मोडला विराट कोहलीचा विक्रम, वनडे इतिहासात सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला.
भारतीय सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात शानदार खेळी करत एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीचे कौशल्य कायम ठेवले आहे. एकदिवसीय सामन्यामध्ये अवघ्या 19 डावात सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा तो भारतीय ठरला आहे. १००० धावांचा हा टप्पा गाठण्यासाठी विराट कोहली आणि शिखर धवन याना २४ डावांचा कालावधी लागला होता विराट व शिखर पेक्षा ही कामगिरी त्याने जलद गतीने केली.
सर्वात कमी डावांमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये जलद १००० धावा करणारे जगातील फलंदाज
18 – फखर जमान
19 – शुभमन गिल / इमाम उल हक
21 – विव रिचर्ड्स/ केविन पीटरसन/ जोनाथन ट्रॉट/ क्विंटन डी कॉक/ बाबर आजम/ रासी वीडी डुसेन
सर्वात कमी डावांमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये जलद १००० धावा करणारे भारतीय फलंदाज
19 – शुभमन गिल
24 – विराट कोहली/ शिखर धवन
25 – नवजोत सिंग सिंधू/ श्रेयस अय्यर