IND VS SL: वन-डे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज; पहा कधी आणि कुठे होणार सामने?
Maharashtrasena News: IND VS SL ODI
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात नुकतीच T20 मालिका पार पडली. IND VS SL T20I हि मालिका भारतीय संघाने 2-1 अशी जिंकली आहे. T20 च्या या मालिकेनंतर आता भारतीय संघ विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये वन डे मालिका सुरु होणार आहे. २०२३ या नवीन वर्ष्याच्या पहिल्याच आठवड्यात टीम इंडिया ने T-20 मालिका २-१ ने जिंकून दमदार सुरवात केली आहे. IND VS SL T20 मालिकेसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व हार्दिक पांड्याने केले होते. सूर्यकुमार यादव ने या मालिकेत दमदार शतक झळकावले तर अक्षर पटेल ने चांगली कामगिरी केली व “प्लेयर ऑफ द सिरीज” बनला.
IND VS SL वन-डे मालिकेला सोमवार दिनांक 10 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. वन-डे मालिकेसाठी पाच दिवसांच्या आत ३ सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे IND VS SL हे सर्व सामने डे-नाईट होणार आहेत.
IND VS SL या वन-डे मालिकेसाठी टीम इंडिया मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहे. T 20 मालिकामध्ये भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आता वरिष्ठ खेळाडू वन-डे मालिका खेळणार आहेत. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली तर गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. दुखापत ग्रस्त असल्याने टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह T20I World cup 2022 खेळू शकला नव्हता त्याचे IND vs SL वन-डे मालिकेमध्ये पुनर्रआगमन होत आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. दुसरीकडे श्रीलंका संघामध्ये फारसे बदल होणार नाहीत.
IND VS SL वन-डे मालिकेचे वेळापत्रक
IND VS SL ODI पहिला सामना
भारत विरुद्ध श्रीलंका (IND VS SL) वन डे मालिकेतील पहिला सामना सोमवार दिनाक. 10 जानेवारी २०२३ रोजी दुपारी 1:30 होणार आहे. हा सामना गुवाहाटी येथील बालसपारा क्रिकेट स्टेडियम खेळला जाणार आहे.
IND VS SL ODI दुसरा सामना
दुसरा क्रिकेट सामना गुरुवार, दि.12 जानेवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डंन स्टेडियम वर होणार आहे.
IND VS SL ODI तिसरा सामना
तिसरा सामना रविवार दि.15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका कुठे पहाल सामना : IND VS SL Live Streaming
भारत विरुद्ध श्रीलंका (IND VS SL) यांच्यात होणारी वन-डे मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या (Star Sport Network) टीवी चैनल्सवर पाहता येईल. तसेच या Match चे लाईव्ह प्रक्षेपण डिझनी+हॉटस्टार या अँपवर पाहू शकता.
वन-डे मालिकेसाठी संघ :
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, ईशान किशन, शुभमन गिल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, उमरान मलिक .
श्रीलंका संघ: दासुन शनाका, चरिथ असलंका, कुसल मेंडिस, अशान बंडारा, वानिंदु हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदु फर्नांडो, चामिका करुणारत्ने, दिलशान मदुशंका, लाहिरू कुमारा, पाथुम निसंका, कासुन राजिथा, प्रमोद मदुशन, सादीरा समरविक्रमा, जेफ्री वांदरसे, महीष तीक्षणा, दुनिथ वेलालगे.
ind-vs-sl-team-india-is-ready-to-rock-in-odi-series-view-the-schedule-of-matches