नौदल दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रम
Maharashtrasena News: नौदल दिनानिमित्त (Indian Navy Day) आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी नौदल गोदीतल्या गौरव स्तंभ इथं आदरांजली अर्पण केली. यावेळी संचलनाचं आयोजनही करण्यात आलं होतं.
नौदलातील वीरांचं अतुलनीय शौर्य, ध्यैर्य आणि सेवा वृत्ती यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तसंच विविध सागरी विजयांची स्मृती म्हणून मुंबईत ४ डिसेंबर २०२० रोजी गौरवस्तंभ उभारण्यात आला.
नौदलातील हुतात्म्यांच्या अतुलनीय शौर्याची आठवण भावी पिढयांमध्ये जागृती राहावी म्हणून या शौर्य स्तंभावर २७४ वीर नौ सैनिकांचं नावं कोरण्यात आली आहेत. यामध्ये गोवा मुक्ती संग्राम, १९७१ चं भारत-पाक युध्द तसंच दहशतवाद विरोधी कारवाया आणि देश आणि देशवासियांचं संरक्षण करताना धारातिर्थी पडलेल्या वीरांची नावं या स्तरांवर कोरण्यात आली आहेत. नौदलाच्या पश्चिम विभागातील वरिष्ठ अधिकारी तसंच माजी नौदल अधिकारी कमोडर एस.एन.सिंग आणि लेफ्टनंट कमोडर फारुख तारापोर यांनीही गौरव स्तंभावर आदरांजली वाहिली.
Indian Navy Day 2022
events-in-mumbai-on-navy-day-2022