महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे ( Places to visit in Mahabaleshwar )
महाराष्ट्र सेना ऑनलाईन: महाबळेश्वर अर्थात थंड हवेचे ठिकाण. महाबळेश्वर हे महाराष्ट्रामधील अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या लेखामधून आपण महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे ( Places to visit in Mahabaleshwar ) पाहणार आहोत.
सातारा जिल्हा पाहाण्यासारखी ठिकाणे / सातारा पर्यटन स्थळे
सातारा जिल्ह्यात असणारे महाबळेश्वर ( mahableshwar) हे पुणे शहरापासून साधारणतः १२५ कि.मी. आहे. तर मुंबई शहरापासून २७० कि.मी. आहे. व सातारा शहरापासून ५६.८ कि. मी. आहे.
सुप्रसिद्ध असणारे महाबळेश्वर ची समुद्र सपाटीपासूनची उंची ही १३७२ मी . आहे.
वर्षभरात लाखो पर्यटक येथे देश – परदेशातून येथे फिरण्यासाठी आपल्या कुटुंब, मित्र परिवारासोबत किंवा शालेय साहिलीसाठी येत असतात.
मुंबई किंवा पुणे वरून NH48 महामार्गाने जाताना सुरूर हे एक गाव लागते. येथे महाबळेश्वर- पांचगणी ला जाण्यासाठी फाटा फुटतो ( सुरूर फाटा ). महामार्गाच्या उजव्याबाजूने जाणारा हा रोड ला वाई-सुरूर रोड असे नाव आहे.
महामार्गावरून महाबळेश्वर कडे जातं असताना पाचवड येते दुसरा फाटा/ मार्ग आहे. येथूनच आपण वाई मार्गे अथवा कुडाळ-पांचगणी मार्गे जाऊ शकता.
महाबळेश्वर ला जाताना आपणाला वाई हे ठिकाण लागेल. येथे प्रसिद्ध गणपती मंदीर आहे.
वाई ( Wai )
गणपती मंदिर, वाई ( Ganpati Mandir, Wai )
कृष्णा नदीकाठावर असणारे अत्यंत सुंदर, मनमोहक, भव्य श्री गणेशाची मूर्ती असणारे हे मंदिर आहे. मंदिराला जोडूनच नदीकाठावर छोटी -मोठी अनेक मंदिरे आहेत. त्यामध्ये भगवान महादेवांचे मंदिर आहे.
या मंदीर आवारात खूप चित्रपटांचे चित्रीकरण होत राहते. हिंदी मधील ” गंगाजल ” या चित्रपटाचे चित्रीकरण येथे केले गेले होते.
वाई मधून पांचगणी मार्गे निघताना एक घाट लागतो १३ कि. मी. चा. व आपण पांचगणी मध्ये पोहचतो.
पांचगणी मधील पर्यटन स्थळे ( Places to visit in Panchgani )
पांचगणी मधील पर्यटन स्थळे ( Places to visit in Panchgani )
हर्रीसन्स फॉल्ली / थापा ( Harrisons Folly, Panchgani )
वाई कडून पांचगणी दिशेकडे जाताना घाट चढल्यावर घाटाच्या टोकाला आपणाला रस्त्याच्या उजव्या बाजूला हर्रीसन्स फॉल्ली ( Harrisons Folly ) हा टुरिस्ट पॉईंट दिसेल.
टोकाशी असलेला हर्रीसन्स फॉल्ली / थापा ( Harrisons Folly ) थोडासा सपाट भाग असलेला डोगराच्या टोकाशी आहे. येथून वाई भागातील काही गावे नजरेस पडतात पसरणी, चिखली वगैरे.
थंडीच्या दिवसामध्ये सूर्योदय अगोदर येथे आपणास घणदाट धुके पाहायला मिळतील. तर अगदी आपणास येथे स्वर्ग असल्यासारखा नजरा पाहण्यास मिळेल. आपण अत्यंत सुंदर दृश्य नजरेत कैद करू शकता.
पॅराग्लाइडिंग (Paragliding in panchgani )
Harrisons Folly हा पॉईंट पॅराग्लाइडिंग साठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
Harrisons Folly च्या पुढे डाव्या बाजूस आपणास दांडेघर गाव आहे. येथे एक केदारेश्वर मंदीर आहे.
केदारेश्वर मंदीर, दांडेघर ( Kedareshwar Temple Dandeghar)
केदारेश्वर मंदीर, दांडेघर (Kedareshwar Temple) येथे आपण सुंदर असे शिवलाय पाहू शकता.
शेरबाग थीम पार्क ( Sherbaug Theme Park, Panchgani )
दांडेकर गावापासून पांचगणी मार्गाकडे थोडा पुढे आल्यावर शेरबाग थीम पार्क ( Sherbaug Theme Park ) हा टुरिस्ट पॉईंट आपण पाहू शकता. रस्त्याच्या डाव्याबाजूस शेरबाग थीम पार्क आहे. या बागे मध्ये विविध प्रकारे आपणाला मनोरंजनाची साधने पाहायला मिळतील.
यामध्ये खुपसारी फुलांची सुंदर झाडे आहेत, तर झाडावर बसण्यासाठी ट्री हाऊस आहेत तसेच झोपळेही आहेत.
वॉटर पार्क, जेवणासाठी रेस्टोरंट, वेगवेगळ्या प्रकारचा शंख शिंपल्यांचा संग्रह , होर्रर हाऊस आहे.
येथे प्रवेश शुल्क द्यावा लागतो.
सिडनी पॉईंट ( Sydney Point, Panchgani )
शेरबाग थीम पार्क पासून पुढे आल्यावर काही अंतरावर दांडेघर नाका येतो येथे रस्त्याच्या उजव्या बाजूस सिडनी पॉईंट ( Sydney Point ) आहे. अत्यंत सुंदर असा नजारा येथून आपण पाहू शकता.
धोम धरण येथून सहज आपल्या नजरेस पडेल. कृष्णा नदीवरचे असणारे धोम धरण / धोम डॅम ( Dhom Dam)वर आपणास जाण्यासाठी वाई मार्गे रास्ता आहे.
तसेच टेबलं लॅन्ड, रेविन हॉटेल, न्यू इरा स्कुल, पांचगणी शहराचा काही भाग दिसतो.
टेबल लॅन्ड ( Table Land, Panchgani )
पांचगणीमध्ये पोहचल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे येथून डाव्या बाजूस जो रोड आहे; तो टेबल लॅन्ड ( Table Land) ला जातो.
पांचगणीची समुद्र सपाटी पासूनची उंची १ ,२९३ मी आहे.
महाबळेश्वर येथील ” पांचगणी येथे असणारे टेबल लॅन्ड ( Table Land / Table Point ) ” हे आशिया खंडातील २ नंबर चे सर्वात मोठे पठार आहे.
टेबल लॅन्ड येथे दोन प्राचीन गुहा आहेत, वन ट्री पॉईंट, पांडवांचे पाय ( पाऊल खुणा ), पांडवांची चूल तसेच दोन पाण्याचे तलाव आहेत त्याचा वापर तेथील पर्यटकांना फिरवण्यासाठी असणाऱ्या घोडे याना पिण्यासाठी होतो.
या पठारावर हॉर्स रायडींग सुद्धा करू शकता. खाण्यासाठी हॉटेल्स सुद्धा आहेत.
निसर्गरम्य असणाऱ्या पांचगणी या परिसरात येथे विविध हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा झाले आहे.
राजा हिंदुस्थानी, तारे जमीन पार, मेला, हम तुम्हारे हे सनम, एजन्ट विनोद, बॉडी गार्ड तसेच अनेक चित्रपटांचे काही छोटे गाणी चित्रीकरण, येते करण्यात आली आहेत.
बेबी पॉईंट ( Baby Point )
बेबी पॉईंट हे ठिकाण छोट्या मुलांना खेळण्यासाठी गार्डन/ पार्क आहे.
ऑन व्हीलझ अॅम्यूजमेंट पार्क ( On Wheelz Amusement Park, Panchgani )
ऑन व्हीलझ अॅम्यूजमेंट पार्क ( On Wheelz Amusement Park) हे पांचगणी बस स्थानकापासून साधारणतः १- १.५ कि. मी. अंतरावर आहे.
पांचगणी कडून महाबळेश्वर कडे जाताना संजीवन स्कुल ( Sanjeewan School) पासून डाव्या बाजूस एक फाटा फुटतो ( कुडाळ – पाचवड रोड). येथून ४००-५०० मी. वर ऑन व्हीलझ अॅम्यूजमेंट पार्क आहे.
या ठिकाणी मनोरंजनासाठी सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप सारी साधने आहेत. मोनो रेल, बंजी जम्पिंग, इटेरिज, रोमांचकारी आणि मजेदार सवारीने भरलेले सर्व वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध ठिकाण.
येथे प्रवेश शुल्क द्यावा लागतो. सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत उघडे असते.
पारसी पॉईंट ( Parsi Point )
पारसी पॉईंट ( Parsi Point ) पांचगणी मधून महाबळेश्वर मार्गे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूस आहे. येथून निसर्ग रम्य असे कृष्णा खोरे, धोम धरण, दृश्य दिसते.
या ठिकाणी काही खाद्यपदार्थांची दुकाने आहेत.
भिलार वॉटर फॉल पॉइंट ( Bhilar Water Fall Point )
भिलार वॉटर फॉल पॉइंट ( Bhilar Water Fall Point ) हा पारसी पॉईंट च्या पुढे महाबळेश्वर कडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूस आपणास पाहण्यास मिळतो.
पावसाळ्याच्या दिवसामध्ये याचे दृश्य पाहण्यासारखे असते. तर हा पॉईंट आपण दुरूनच पाहू शकतो. येथे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध नाही.
व्हेलॉसिटी इंटरटाइनमेंटझ ( Velocity Entertainmentz )
व्हेलॉसिटी इंटरटाइनमेंटझ ( Velocity Entertainmentz) हा पॉईंट पांचगणी – महाबळेश्वर मार्गावर आहे. हे एक करमणूक पार्क आहे.
या ठिकाणी सर्व वयोगटातील सवारी, मोनोरेल, इटेरिज आणि बंजी जम्पिंग मनोरंजनाची उपकरणे उपलब्ध आहेत.
येथे प्रवेश शुल्क आकारण्यात येते.
मॅप्रो गार्डन ( Mapro Garden)
मॅप्रो गार्डन ( Mapro Garden) पांचगणी -महाबळेश्वर मार्गावर गुरेघर या गावामध्ये असणारे प्रसिद्ध ठिकाण.
पांचगणी- महाबळेश्वर म्हटलं कि स्ट्रॉबेरी. मॅप्रो गार्डन या ठिकाणी स्ट्रॉबेरी तसेच विविध प्रकारचे जाम व ज्यूस ची साधने खरेदी करू शकता.
मॅप्रो ही एक जाम फॅक्टरी आहे.
येथे स्ट्रॉबेरी शेती, विविध प्रकारची रंगबेरंगी फुले आपणास पाहण्यास मिळतील. तर खाण्याच्या पदार्थासहीत येथे कॅफे सुद्धा आहे.
हॉलिवूड वॅक्स म्युझिअम ( Hollywood Wax Museum )
हॉलिवूड वॅक्स म्युझिअम ( Hollywood Wax Museum) हे मॅप्रो गार्डन पासून महाबळेश्वर रोड वर आहे. या ठिकाणी अनेक हॉलिवूड कलाकारांचे मेणापासुन प्रतिकृती बनवण्यात आले आहेत.
लिंगमाळा वॉटर फॉल ( Lingmala Waterfall Point )
लिंगमाळा वॉटर फॉल ( Lingmala Waterfall Point ) हा पांचगणी- महाबळेश्वर मार्गापासून एका बाजूस एक घनदाट जंगलातून जाणाऱ्या अरुंद रस्त्यापासून थोडा दूर आहे.
मनमोहक असा लिंगमाळा वॉटर फॉल पाहण्यासाठी प्रवेश शुल्क द्यावे लागते. व तेथेच वाहने पार्क करून झाडांमधून ज्या पायऱ्या आहेत त्या द्वारे मार्ग निवडावा लागतो.
येथे दोन धबधबे आहे. छोटा व एका मोठा लिंगमाळा वॉटर फॉल. जो छोटा लिंगमल्याचा धबधबा आहे येथे पर्यटक सहज पाण्यामध्ये जाऊन आणंद लुटू शकतात.
जो मोठा लिंगमाळा वॉटरफळलं पाहण्यासाठी थोडा पुढे जावं लागते. थोडा दुरूनच त्याचे दृश्य आपण पाहू शकता.
प्रवेश शुल्क: २० रु. वेळ – सकाळी ८- सायंकाळी ५.३०. वाजे पर्यंत.
महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे ( Places to visit in Mahabaleshwar )
Places to visit in Mahabaleshwar
व्हेना लेक पॉईंट ( Venna Lake Point, Mahableshwar)
व्हेना लेक पॉईंट ( Venna Lake ) हा पॉईंट म्हणजे महाबळेश्वरच्या प्रवेशद्वार. महाबळेश्वरच्या सुरुवातीला व्हेना लेक पॉईंट आपणास पाहण्यास मिळतो.
विल्सन पॉईंट ऑफ सनरायझ ( Wilson Point of Sunrise)
केटस पॉईंट ( Kates Point )
केटस पॉईंट ( Kates Point )
बॅबिंग्टन पॉइंट ( Babington Point)
सनसेट पॉईंट ( Sunset Point )
एलिफन्ट’स हेड पॉईंट ( Elephant’s Head Point )
पंचगंगा मंदिर ( Panch Ganga Temple )
महाबळेश्वर मंदिर ( Mahabaleshwar Temple )
आर्थर सीट पॉईंट( Arthur’s Seat Point)
बॉम्बे पॅाईंट ( Bombay Point )
इको पॅाईंट ( Eco Point )
मंकी पॅाईंट ( Monkey Point )
सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण
सातारा पर्यटन स्थळे
1 thought on “महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे ( Places to visit in Mahabaleshwar )”