Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांची भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

Murlidhar Mohol
ad3

पुणे: पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol ) यांना भाजपकडून बढती देण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांची भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र जाहीर केलं आहे.

मागील काही दिवसांपासून भाजप मध्ये संघटनात्मक बदल पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजप सरचिटणीस पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यानुसार श्रीमती माधवी नाईक, मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, संदीप केणेकर, रणधीर सावरकर यांची भाजपा प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.