Monsoon session of Parliament: संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार, या अधिवेशनात ३१ नवीन विधेयकं सादर होणार
Maharashtrasena News: संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon session of Parliament 2023) आजपासून सुरु होत आहे. २३ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण ३१ विधयेकं सदनात मांडली जाणार असून १७ बैठका होतील.
संसदेच्या जुन्या इमारतीत दोन्ही सभागृहांचं कामकाज होणार आहे. अधिवेशनाच्या (Monsoon session 2023) पूर्वसंध्येला काल केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. या बैठकीला ३४ पक्षांचे ४४ नेते उपस्थित होते.
मणिपूर हिंसाचार, महागाई देशातली पूर परिस्थिती यावर सदनात चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी या बैठकीत केली. कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रह्लाद जोशी यांनी या बैठकीत केलं.
अधिवेशनात (Monsoon session of Parliament) मणिपूर प्रश्न, महागाई, देशातली पूर परिस्थिती यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल असं जोशी यांनी सांगितलं. संसदेचं अधिवेशन ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
Monsoon session 2023
Monsoon session of Parliament
Monsoon session
Monsoon session of Parliament will start from today, 31 new bills will be introduced in this session