Tuesday, March 19, 2024
Homeराष्ट्रीयWorld Environment Day : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन

World Environment Day : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन

Maharashtrasena: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात युद्धस्मारक परिसरात, दक्षिण विभागाचे लष्करप्रमुख ए.के. सिंह यांच्या हस्ते रुद्राक्षाचं रोप लावून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. या वेळी भारतातील विविध राज्याच्या मातीचं पूजन करून वृक्षरोपण करण्यात आलं.

केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं बुलडाणा इथं वृक्षलागवड करूया आणि पर्यावरण वाचवुया हा संदेश देत, पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात आली. तसंच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारं पथनाट्यही सादर करण्यात आलं.

नागपूरमध्येही केंद्रीय संचार ब्युरो च्या वतीनं चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासह जुनी वस्ती रणाळा मंदिर परिसरात वृक्षारोपण ही करण्यात आलं.

परभणीत नांदेड संचार ब्यूरो च्या वतीनं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विशेष प्रचार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. विद्यापीठाचे संचालक धर्मराज गोखले यांनी विद्यापीठात सुरु पर्यावरण अनुकूल वृक्ष लागवड, स्वच्छता कार्यक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमात तृणधान्य आणि पर्यावरण या विषयावर पोष्टर आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच पर्यावरण अनुकूल कापडी पिशव्यांचं वाटपही करण्यात आलं. विद्यापिठात यावेळी वृक्षलागवडीचा प्रारंभ करण्यात आला तसचं स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली.

 

 

Various programs are also organized in the state on the occasion of World Environment Day

 

World Environment Day, World Environment Day 2023, World Environment Day theme 2023, World Environment Day quotes, World Environment Day poster, World Environment Day poster 2023, World Environment Day slogan, World Environment Day theme, World Environment Day image, World Environment Day drawing

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!