Maharashtra Pune Bypoll Election: राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटे यांना उमेदवारी; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार
Maharashtrasena News: राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटे (Nana kate) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी ट्वीट करुन चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नाना काटे उमेदवार असतील असे जाहीर केलं आहे. अजित पवार (Ajit Dada Pawar) यांच्या उपस्थितीत चिंचवड मध्ये नाना काटे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT @NANA_PATOLE
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023
पुण्यातील कसबा (Kasba Bypoll) व चिंचवड (Chinchwad Bypoll) येथे पोटनिवडणूक होणार आहे. पुणे पोटनिवडणुकीत (Bypoll Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) अशी थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी (BJP) पक्षाने दोन्ही जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून बराच काळ उमेदवारांचे नावे जाहीर केली गेली नव्हती व आज पर्यंत राष्ट्रवादी (Rashtrawadi)कडून उमेदवार कोण असणार हा सस्पेन्स ठेवण्यात आला होता.
महाविकास आघाडीकडून चिंचवडची जागा राष्ट्रवादीला आणि कसब्याची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. काँग्रेसनं कसब्यातून बाळासाहेब दाभेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून चिंचवड येथील जागेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नव्हती. मात्र आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. नाना काटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना (उद्धव ठाकरे) पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले, आरपीआय खरात गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन खरात उपस्थित होते.