Bubble Tea Google Doodle : बबल टी गुगल डूडल बबल टी कसा बनवावा, जगभरात आहे लोकप्रिय
Maharashtrasena :Bubble Tea Google Doodle
गुगलने आज एक खास डुडल शेअर केले आहे ज्याद्वारे जगभरात प्रसिद्ध असलेला बबल टीच्या ( Bubble tee) लोकप्रियतेचा जल्लोष केला जात आहे. बबल टी हे एक चहा पेय आहे ज्याची लोकप्रियता कोविड -19 दरम्यान प्रचंड प्रमाणात वाढली आणि तेव्हापासून हे पेय ट्रेंड होत आहे.
गुगलने एक इंटरॅक्टिव्ह डूडल शेअर केले आहे ज्याद्वारे तुम्ही ‘डिजिटल बबल टी’ तयार करू शकता. तुम्ही गुगल च्या वेबसाईट वर गेल्यानन्तर तुम्हाला फक्त गुगल डूडलवर क्लिक करावं लागेल आणि तुमच्या स्क्रीनवर ऍनिमेशन वाजायला सुरुवात होईल, ऍनिमेटेड विडिओ सुरु होईल तुम्ही त्यावर क्लिक करून पुढील स्टेपला जाऊ शकता .
२९ जानेवारी 2020 याच दिवशी इमोजीची घोषणा करण्यात आली होती.
गुगल आज बबल टीची लोकप्रियता साजरी करत आहे, कारण हे पेय जगभरात इतके लोकप्रिय झाले की 2020 मध्ये याच दिवशी २९ जानेवारी ला बबल टी इमोजी म्हणून घोषित केले गेले होते. आज इतके प्रसिद्ध असलेले पेय तैवानमध्ये सुमारे सतराव्या शतकापासून प्यायले जात आहे.
बबल टी या ड्रिंकबद्दल गुगलने आपल्या डूडल पेजवर लिहिले आहे की, “हे तैवानी पेय स्थानिक उपचार म्हणून सुरू झाले व गेल्या काही दशकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. बबल टी मुळे पारंपारिक तैवानी चहा संस्कृतीशी संबंधित आहेत.”
बबल टी (चहा) कसा बनवावा ( How to Make Bubble Tea)
बबल टी या पेयाला बोबा टी, पर्ल टी किंवा टॅपिओका टी म्हणून देखील ओळखले जाते. हे पेय दूध किंवा ग्रीन टीच्या बेससह बनविले जाऊ शकते. बबल टीमध्ये टॅपिओका बॉल्स घातले जातात, ज्याला भारतात साबुदाणा असेही म्हणतात.
बबल टी बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
साहित्य : १ वाटी टॅपिओका पर्ल्स, चहाची पाने, ब्राऊन शुगर किंवा मध, दूध
- प्रथम, टॅपिओका पर्ल्स किंवा गोळे उकळा. एका कपमध्ये पाणी गरम करा, व त्यामध्ये आता टॅपिओका बॉल घाला आणि ते पाण्यावर तरंगण्यास सुरवात होईपर्यंत ते शिजवा. तुम्हाला टॅपिओका पर्ल्स हे बाजारात मिळतील.
2. यानंतर चहाची पाने पाण्यात टाकून उकळून घ्या. व त्यानंतर आता ते फिल्टर करून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
3.आता शिजवलेले टॅपिओका पर्ल्स एका ग्लासमध्ये किंवा कप मध्ये ठेवा. आपल्या आवडीनुसार मध किंवा इतर कोणतेही गोड घालावे. त्या ग्लासला/ कप ला मध अथवा गोड सरबतने आतून लेप करा.
4. त्यानंतर ग्लासमध्ये थंड चहा टाका आणि त्यावर दूध घाला. स्वीटनर आणि दूध एकत्र करण्यासाठी स्ट्रॉ वापरून हे मिश्रण मिसळा आणि बबल टी चा (चहाचा) आनंद घ्या.