छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व राजधानी सातारा (Rajdhani satara ) या सेल्फी पॉईंट चे उदयनमहाराजांच्या हस्ते उदघाटन
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व राजधानी सातारा (rajdhani satara) या सेल्फी पॉईंट चे खा. छत्रपती उदयन महाराजांच्या हस्ते उदघाटन दिनांक. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी करण्यात आले.
राजधानी सातारा हा सेल्फी पॉईंट पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेले गाव – वेळे (तालुका – वाई ) या ठिकाणी आहे.
शिवभक्त रोहन यादव या तरुणाने हा ५० फूट अश्वारूढ भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला व राजधानी सातारा हे या सेल्फी पॉईंट ला नाव दिले .
राजधानी सातारा या सेल्फी पॉईंट चे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती. उदयन राजे भोसले यांच्या च्या हस्ते करण्यात आले.
खासदार छत्रपती. उदयन राजे भोसले यांचं वक्तव्य
“छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा व राजधानी सातारा सेल्फी पॉईंट चे उदघाटन करणे साठी मी स्वतःचे भाग्य समजतो.
या ठिकाणा मुळे सातारा जिल्ह्याचा इतिहास देश्याच्या कानाकोपऱ्यात पसरणार असून जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे.”
रोहन यादव यांचं वक्तव्य
” पुणे बंगलोर १००० किमी. राष्ट्रीय महामार्गावर एकही छत्रपतींचा पुतळा नाही. सर्वत्र आय लव्ह कराड, आय लव्ह पुणे असे सेल्फी पॉईंट पाहायला मिळतील ,
पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व मराठयांची राजधानी सातारा कायम लोकांच्या मनात राहावा यासाठी त्यांनी या ठिकाणी राजधानी सातारा सेल्फीपॉईंट त्यांच्या जागेत उभारला.
साताऱ्याचा खूप मोठा इतिहास आहे. असे रोहन यादव यांनी व्यक्त केले.”
रोहन व त्यांच्या सहकार्यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी सण. २०१६ पासून तयारी केली होती.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे तरुण युवक शिवभक्त रोहन यादव व त्याच्या सहकार्यांनी हा अनोखा उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली.
ठिकाण
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या राजधानी सातारा सेल्फी पॉईंट ( Rajdhani Satara Selfiepoint) हे ठिकाण
गाव : वेळे, तालुका – वाई, जिल्हा – सातारा ) येथे आहे .
Rajdhani Satara