शिलालेखाचे ठसे घ्यायच्या पद्धति व तंत्रज्ञान !!(Methods and technology for taking inscriptions )

Methods and technology for taking inscriptions
ad3

शिलालेखाचे ठसे घ्यायच्या पद्धति व तंत्रज्ञान !!

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : शिलालेखाचे ठसे घ्यायच्या पद्धति व तंत्रज्ञान !! (Methods and technology for taking inscriptions !!)

शिलालेखाचे ठसे घ्यायच्या पद्धति व तंत्रज्ञान !!

पुणे जिल्ह्यातील सरंक्षित व असरंक्षित स्मारकावर असलेले संस्कृत व देवनागरी भाषेतील शिलालेखांचे स्टॅम्प घेउन वाचन करावयाचा नियोजित दौरा होता


या करिता अर्कॉलॉजी सर्वे ऑफ इंडिया (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग) लखनऊ उत्तर प्रदेश या ठिकाणाहून एपिग्रफी डिपार्टमेंट (शिलालेख विभागातून ) श्री आदित्य कुमार सिंगरेड्डी व त्यांचे असिस्टंट श्री महेश चंद्र यांचा महाराष्ट्रात शिलालेख अभ्यास व रिपोर्ट बनवयाचे नियोजन होते

दिनांक सहा ते आठ मार्च 2021 या दरम्यान महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आळंदी, शेल पिंपळगाव , खरपुडी बुद्रुक , दावड़ी निमगाव खंडोबा , राजगुरुनगर , नारायणगाव , मंचर , खडकी पिंपळगाव ,पिंपळे जगताप .

व अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेर, चिंचोली, पारनेर, गांजीभोयरे, व जावळे, या गावातील जवळपास 30 शिलालेखांची अधिकृत प्रत्येकाचे 4 ठसे घेण्यात आले. सदर शिलालेखांचे ठसे कसे घ्यायची पद्धती याची माहिती त्यांच्याकडून मिळाली .

त्यांनी घेतलेल्या या सर्व शिलालेखांचे ठसे घेऊन ते वाचून त्याचे संशोधन करण्यात येणार आहे व हे सर्व केलेले काम ऑनलाईन करून त्याचे लगेच डिजीटलायजेशन करण्यात येईल .

येणार्‍या पुढच्या पिढी करता त्याची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी ,इतिहासाचे जतन संवर्धन व्हावे तसेच गावाचा इतिहास लुप्त होऊ नये त्याची माहिती जगासमोर यावी याकरता त्याचा ॲन्यूअल रिपोर्ट ऑफ इंडियन इपीग्राफी मधे समाविष्ट करण्यात येणार आहे.

सदर टीम ने शिलालेखाला रंग ,चुना व इतर कोणताही केमिकल्स घटक लावू नये कारण हे इतिहासाचे एक महत्वपूर्ण साधन आहे ते चिरकाल टिकावे ,व पुढच्या पिढीने त्याचे जतन संवर्धन करावे असे आवाहन केले.

अनिल दुधाने

Methods and technology for taking inscriptions