Saturday, September 30, 2023
HomeबॉलीवूडTV अभिनेत्री तुनिषा शर्माची मालिकेच्या सेटवरच आत्महत्या | TV actress Tunisha Sharma...

TV अभिनेत्री तुनिषा शर्माची मालिकेच्या सेटवरच आत्महत्या | TV actress Tunisha Sharma dies by suicide

TV अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या, मालिकेच्या सेटवरच लावला गळफास

Maharashtrasena News: टेलिव्हिजनच्या जगातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अली बाबा : दस्तान ए काबूल या मालिकेचा भाग असलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिचे मुंबईत (Mumabi) सेटवर निधन झाले. नायगाव येथील मेकअप रूममध्ये तिने सेटवरच आपले जीवन संपवले आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतू त्याठिकाणी डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले.

तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) नेमक कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून कळू शकले नाहीये. मात्र तिच्या आत्महत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) ही अभिनेता शिविन नारंगसोबत एक म्युझिक व्हिडिओ शूट करणार होती.
आत्महत्येच्या सहा तास अगोदर तिने सोसिअल मीडिया इंस्टाग्राम वर पोस्ट केली होती; तुनिषा शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जे जोशाच्या जोरावर पुढे जातात, ते थांबत नाहीत.’
इंस्टाग्राम stories ला तिने सेट वर मेकअप करताना चा विडिओ सुद्धा पोस्ट केला होता.
मात्र अचानक काही तासानंतर तुनिषाच्या आत्महत्येची बातमी सर्वाना समजताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

तुनिषाने (Tunisha Sharma) कहानी २, फितूर आणि बार बार देखो सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. तुनिषा शर्माने ‘भारत के वीर पुत्र- महाराणा प्रताप’ या ऐतिहासिक मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. इंटरनेट वाला लव्ह, इश्क सुभाल्लाह, गब्बर पुंचवाला, चक्रवर्ती अशोक सम्राट, शेर-ए-पंजाब: महाराज रणजीत सिंह अशा अनेक शोजमध्ये ती दिसली होती. ती फक्त २० वर्षांची होती आणि बाल अभिनेत्री म्हणून काम करत होती.

 

Tunisha sharma :Actress

Tunisha sharma age : 20 Year

tunisha sharma instgram account : _tunisha.sharma_

Tunisha sharma instgram account Link :_tunisha.sharma_

 

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!