उदयनराजे भोसले (Udayanraje bhosale) ” कृष्णकुंज ” वर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी

उदयनराजे भोसले (Udayanraje bhosale) ” कृष्णकुंज ” वर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी

मुंबई |दि. २७ फेब्रुवारी २०२१ – खा. छत्रपती श्री.उदयनराजे भोसले (Udayanraje bhosale) यांनी “कृष्णकुंज ” वर म.न.से. अध्यक्ष श्री. राज साहेब ठाकरे (Raj Thackeray ) यांची सायंकाळी ५ वाजता भेट घेतली.

छत्रपती खा. श्री. उदयन राजे भोसले यांनी या आधीही राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव साहेब ठाकरे यांची मुंबई येथे घेतली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष श्री. शरद पवार साहेब यांचीही दिल्ली येते मराठा आरक्षण बद्दल चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती.

कृष्णकुंज, मुंबई या श्री.राज ठाकरे यांच्या घरी झालेली भेटी मध्ये छत्रपती श्री. उदयन राजे भोसले ह्यांनी कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी भेटी घेतली होती.

याबाबत MNS Adhikrut – मनसे अधिकृत या ट्विटर अकाउंट वर पोस्ट करण्यात आली .

या भेटी दरम्यान छत्रपती श्री. उदयन महाराज भोसले यांनी मनसे अध्यक्ष श्री. राज साहेब ठाकरे याना राजमुद्रा हि भेट दिली.

भेटी नंतर छत्रपती खा. श्री. उदयन महाराज भोसले यांनी मीडिया सोबत बोलताना व्यक्त केले की ”

राज ठाकरे माझे जुने मित्र आहेत आणि मुंबई मध्ये मी काही कामा निम्मत आलो होतो.

बरेच दिवस भेट झाली नव्हती आणि कौटूंबातील एक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली,

एकंदरीत महाराष्ट्रातील परिस्थितीवर सकारात्मक चर्चा झाली, महाराष्ट्राला पुढे कसा नेहता येईल या बाबत, ती एक कंस्ट्रक्टिव्ह चर्चा होती ती पक्षाच्या लेवल ची चर्चा नव्हती.”


(Udayanraje bhosale meets Raj thackeray)

Udayanraje bhosale meets Raj thackeray

Mumbai : उदयनराजे भोसले ” कृष्णकुंज ” वर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल.

भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री . राजसाहेब ठाकरे यांची त्यांच्या ” कृष्णकुंज ” या निवास स्थानी भेट घेतली .

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: