Friday, March 29, 2024
Homeराष्ट्रीयनवीन घर बांधण्यासाठी मिळणार 50 लाख रुपये कर्ज; पहा संपूर्ण माहिती.. |...

नवीन घर बांधण्यासाठी मिळणार 50 लाख रुपये कर्ज; पहा संपूर्ण माहिती.. | Star Kisan Ghar Yojana – Home Loan

नवीन घर बांधण्यासाठी मिळणार 50 लाख रुपये कर्ज; पहा संपूर्ण माहिती..

Home Loan: बँक ऑफ इंडियाने (BOI) देशातील शेतकऱ्यांकरता स्टार किसान घर योजना (Star Kisan Ghar) या नावाने फायदेशीर कर्ज योजना सुरू केली आहे. Star Kisan Ghar (Home Loan) या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात घर किंवा फार्म हाऊस बांधण्यासाठी “बँक ऑफ इंडिया” (BOI) बँकेकडून गृहकर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे,

ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक भांडवल नाही त्या शेतकऱ्यांना स्टार किसान घर योजनेतून (Star Kisan Home Loan) नवीन घर बांधण्यासाठी अथवा जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी Bank Of India (BOI) बँकेकडून सहज कर्ज मिळू शकेल.

स्टार किसान घर योजना (Star Kisan Home Loan) ही देशातील सरकारी बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने (BOI) सर्व शेतकऱ्यांना गृहकर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खास केली आहे, या योजनेद्वारे बँक ऑफ इंडिया (BOI) शेतकऱ्यांना स्वतचे नवीन घर बांधण्यासाठी ते दुरूस्तीसाठी कर्ज उपलब्ध करून देते.

Star Kisan Ghar – Home Loan योजनेत 1 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याचा लाभ 8.05 टक्के व्याजदराने दिला जातो. Star Kisan Home Loan या योजनेचा लाभ देशातील BOI मध्ये KCC खाते असलेल्या कृषी कार्यात गुंतलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल, ज्यासाठी शेतकऱ्यांना बँक ऑफ इंडियाच्या (BOI) वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल

योजनेच्या अटी व शर्ती (Star Kisan Ghar Yojana – Home Loan)

१. स्टार किसान घर (Star Kisan Ghar Yojana) या योजनेद्वारे, देशातील शेतकऱ्यांना स्वतःचे नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या घराच्या दुरुस्तीकरता ८.०५ % व्याजदराने रुपये 1 लाख ते 50 लाख पर्यंतचे कर्ज मिळू शकेल.
२. Star Kisan Ghar Yojana या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १५ वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज मिळू शकेल. परतफेडीचा कालावधी १५ वर्षांपर्यंत.
३. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीवर फार्म हाऊसचे बांधकामही करता येणार आहे.
४. स्टार किसान घर योजनेचा (Star Kisan Ghar Yojana – Home Loan) लाभ बँक ऑफ इंडिया (BOI) मध्ये KCC खाते असलेल्या शेतीशी संबंधित शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.

पात्रता

१. वयोमर्यादा : कर्जाच्या परिपक्वतेच्या वेळी वय ७० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
२. ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांसाठी वय/उत्तराधिकार विचारात घेऊन योग्य सहअर्जक घ्यावा लागतो.

Star Kisan Ghar Yojana – Home Loan या योजनेसाठी अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
ओळखपत्र
निवास प्रमाणपत्र
KCC बँक खाते पासबुक
शेतजमिनीची कागदपत्रे
पासपोर्ट आकाराचे फोटो
मोबाईल नंबर

अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे कागदपत्रे असणे आवश्यक आहे

* केवायसी कागदपत्रे (ओळखपुरावा आणि पत्त्याचा पुरावा)
* आयटीआर किंवा उत्पन्नाची कागदपत्रे
* सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे

स्टार किसान घर योजनेत अर्ज कसा करावा Star Kisan Ghar Yojana – Home Loan

Star Kisan Ghar Yojana योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार शेतकरी ऑफलाइन बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करून येथे नमूद केलेली प्रक्रिया वाचून अर्ज पूर्ण करू शकतात.

1.अर्जदारांनी प्रथम बँक ऑफ इंडिया (BOI) च्या अधिकृत वेबसाइट www.bankofindia.co.in ला भेट द्यावी.

2. वेबसाइट च्या होम पेजवर स्टार किसान घर (Star Kisan Ghar) योजनेची Link शोधा व त्यावर क्लिक करा.
आता अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.

3. त्यानंतर अर्जाची PDF तुमच्या समोर उघडेल. आता PDF फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.

4.  फॉर्ममध्ये विचारलेली माहितीची पूर्तता करा आणि कागदपत्रे अपलोड करा व बँकेच्या शाखेत जमा करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ; येथे क्लिक करा

star-kisan-ghar-yojana-home-loan

हे पण वाचा :

Most Popular

error: Content is protected !!